आजच्या घडामोडी

  • जनतेला विश्वासात घेऊन लोकाभिमुख प्रशासकीय कारभार करण्यास प्रथम प्राधान्य, नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची ग्वाही
  • सुत दरात अनैसर्गिक दरवाढ केली जात असल्याने यंत्रमागधारक आर्थिक अडचणीत, आठवड्यातून ४ दिवस कारखाने बंद ठेवण्याची वेळ, दरवाढ करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी
  • सर्कसची जिवंत कला मोजतीय अखेरच्या घटका, इचलकरंजी जवळच्या पंचगंगा कारखाना कार्यस्थळावर सुरू असलेली न्यू गोल्डन सर्कस प्रेक्षकांअभावी पडली ओस, कलाकारांची उपासमार
  • मुक्या जनावरांच्या व्याधींचे अचूक निदान करून त्यांना निरोगी बनवणारे पशुवैद्यक हे पाळीव जनावरांसाठी देवदूतच, जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त विविध कार्यक्रम
  • महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाचे कायमस्वरूपी खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी प्रयत्न करू, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची ग्वाही
  • कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने आणि अपर पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
  • देश-विदेशातील तांदळाचा वापर करून विविध प्रकारच्या बिर्याणीसह बनवले भाताचे ५२१ पदार्थ, कोल्हापूरचे मास्टर शेफ दिग्विजय भोसले यांचा विश्वविक्रम
  • निवडणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तीन संचालकांना अपात्र करावे, ठाकरे गट शिवसेनेची मागणी
  • वसुंधरा दिनीच झाली विविध जातींच्या डेरेदार वृक्षांची कत्तल, पर्यावरण प्रेमींमधून संताप, दुर्गमानवड-बुरंबाळी मार्गावरील घटना
  • प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुटुंबियांना धमकी दिल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाकपचं अपर पोलिस अधीक्षकांना निवेदन
  • इचलकरंजीतील अतिक्रमण काढल्यानंतर व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्यासाठी महापौरांनी केली पाहणी
  • सुरेश हाळवणकर यांना पक्ष कार्याचं बक्षिस नक्की मिळणार, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
  • कोल्हापुरात आयटी पार्क मंजूर होण्यासाठी योगदान दिलेल्या लोकप्रतिनिधी आणि संस्थांचा आयटी असोसिएशनच्यावतीनं झाला सत्कार
  • अलमट्टी धरणाच्या संभाव्य उंचीच्या वाढीच्या प्रस्तावाला विरोध करावा, सिटीझन फोरमची पाटबंधारे विभागाकडं मागणी
  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी सभेत नगरसेवक आदिल फरास आणि प्रविण सोनवणे यांच्यात उडाली शाब्दिक चकमक
  • स्थायी सभेत दिव्यांगांचा कोणताही प्रश्न नव्हता, पण प्रविण सोनवणे यांनी असंविधानिक शब्द वापरणं अयोग्य, सभापती विशाल शिराळे यांचं मत
  • कोल्हापुरातील प्रस्तावित आय. टी. पार्कला छत्रपती ताराराणी यांचं नाव देऊन उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, आमदार राजेश क्षीरसागर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडं मागणी

टिप्पण्या