रत्नागिरी जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न, सभापती ॲड. सुयोग कांबळे यांनी घेतला विविध योजनांचा आढावा
रत्नागिरी जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची पहिली बैठक शुक्रवारी उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थित समिती सदस्यांनी ॲड. सुयोग कांबळे यांची सभापती म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या बैठकीवेळी 5% दिव्यांग योजना, शिष्यवृत्ती योजना, दहावीपर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना, मूकबधिरांसाठी आर्थिक सहाय्य योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या अंतर्गत 2025/26 मध्ये मंजूर आराखड्यातील कामांचा अहवाल मागविण्यात आला. समाज कल्याण विभागाचा 2026/27 चा आराखडा निधी प्राप्त झाल्यानंतर तयार करण्यात येईल. असा सविस्तर आढावा सभापती ॲड. सुयोग कांबळे यांनी घेतला. या बैठकीवेळी सर्व सदस्यांना संविधानाची प्रत वितरित करण्यात आली. यावेळी समाजकल्याण समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, सुशील भायजे, सिद्धाली मोरे, नितीन दुर्गवले, ऐश्वर्या धाडवे, उषा सावंत, हर्षदा गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा