व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे राजापूर तालुक्यातील हॉटेल व्यवसायिक चिंताग्रस्त

अमेरिका आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणाम भारतातल्या गॅस, इंधन पुरवठ्यावर झाला आहे. दरम्यान व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे संपूर्ण देशात, महाराष्ट्रात हॉटेल व्यावसायिकांवर परिणाम होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा युद्धाच्या परिणामांना समोर जावे लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वेळी, अवेळी होत असलेल्या पुरवठ्यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. राजापूर तालुक्यातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी बरेचसे पदार्थ बनवण्याचे थांबवले आहे. काही हॉटेल बंद झाली आहेत. तर काहींनी चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली आहे.

कोकणात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक पर्यटक येतात. राजापुरातील धोपेश्वर मंदिर, गंगतीर्थ, उन्हाळे गरम पाण्याचे कुंड, कशेळी सूर्यमंदिर, कशेळी समुद्रकिनारा, आंबोळगड, जैतापूर, माडबन समुद्र किनारा, देवगड, आदी भागात अनेक पर्यटक येत असतात. या पर्यटकांना जेवण, होम स्टे आदी सुविधांची गरज असते. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यासायिकांना पदार्थ तयार करून देता येत नाहीत. काही ठिकाणी रेडीमेड खाद्य पदार्थ द्यावे लागत आहेत.

त्यामुळे राज्यातील महायुती सरकारने कोकणातील पर्यटन स्थळे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारे पर्यटक आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरेसा पुरवठा याबाबत काहीतरी ठोस पावले उचलावीत अन्यथा कोकणातील, राजापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत

टिप्पण्या

news.mangocity.org