ग्रामसेवकाने कामाचे पैसे परस्पर उचलून ठेकेदाराची केली फसवणूक

ग्रामसेवकाने कामाचे पैसे परस्पर उचलून ठेकेदाराची केली फसवणूक 

By - दीपक चुनारकर 
     ग्रामपंचायत पेठा अंतर्गत मोजा येल्लाराम येथे दोन वर्षांपूर्वी स्थानिक निवासी पुष्पाताई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य यांनी नवीन विहिरीचे प्लॅटफॉर्म व ओटा बांधकाम केले. त्यावेळी ग्रामसेवक फिरोज कुमरे यांनी एमबी व सीसी सादर केल्यानंतर बिलाची रक्कम माल दिलेल्या एजन्सीला दिली. तसेच पाच पैकी चार मजुरांची बिल काढले. मात्र एजन्सी कडून त्यांनी पैसे पुन्हा घेऊन व एका मजुराचे पैसे न दिल्याने ठेकेदाराने पंचायत समिती अहेरी येथे लेखी निवेदन देऊन बदली ग्रामसेवकावर कारवाईची मागणी करून कामाचे पैसे ठेकेदाराला परत करायची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
            दीड लाख बांधकाम मंजुरी असलेल्या विहिरीच्या प्लॅटफॉर्म पूर्ण केल्यानंतर ग्रामसेवकाने मजुरी न टाकता उर्वरित 45 हजार मजुरी एका मजुराची रक्कम वगळता खात्यात जमा केली. साहित्य खर्च 81हजार च्या वर 2022-23 मध्ये आहे. 
       सदर रक्कम आर्या एजन्सी आलापल्ली यांना जमा केले. याविषयी एजन्सीच्या मालकांनी अर्जदाराला सदर पैसे उचलून ग्रामसेवक कुमरेला दिल्याचे सांगितले. याची शहनिशा सध्याचे ग्रामसेवक नरोटे यांनी करून व्यवहाराची चाचणी खरी असल्याचे सांगितले.
       मात्र यामुळे ज्याने काम केले त्या ठेकेदाराला पैसे मिळाले नसल्याने परस्पर रक्कम उचलून तत्कालीन ग्रामसेवक यांनी अफरातफर व फसवणूक केली असल्याचे मत पुष्पाताई कांबळे यांनी सांगितले.
       त्यामुळे सदर ग्रामसेवकावर कार्यवाही करून कामाचे पैसे तात्काळ मिळविण्याची विनंती त्यांनी विडिओ पंचायत समिती अहिरे यांना निवेदनातून केली आहे
 बातम्या व जाहिरात साठी संपर्क करा 9511750860

टिप्पण्या