कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांच्या वतीने 15 मे रोजी वर्षा बंगल्यावर धडक देणार: माजी खासदार राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

वर्ष निवासस्थानी जे लोक जेवण जेवत असतील त्याचा रेट तीनशे रुपये पेक्षा जास्त असेल मग कोकणातील आंबा काजूचे नुकसान झाल्यानंतर त्याची नुकसान भरपाई म्हणून प्रति झाडाला अडीचशे रुपये मिळावेत हा शेतकऱ्यांचा मोठा अपमान आहे. संपूर्ण कोकणात दीड कोटीं पेक्षा अधिक आंबा बागायतदार शेतकरी आहेत. त्यामुळे सर्व आंबा बागायतदार नुकसानगस्त शेतकऱ्यांना प्रति झाडामागे किमान पाच हजार रुपये तरी मिळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली असून 15 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पंधरा मे रोजी मुंबईतील वर्षाव निवासस्थानी शेतकऱ्यांसह धडक देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. 

रत्नागिरी येथे बालाजी मंगल कार्यालय या ठिकाणी शेतकरी एल्गार मेळाव्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. त्यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळ माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, कोकण हापूस आंबा उत्पादक शेतकरी संघटनेचे नेते बावा साळवी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका नेहा माने आदींसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते मंडळी उपस्थित होते. 

यावेळी माजी खासदार विनायक राऊत आपल्या भाषणामध्ये मिळाले की रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याच्या साठी करोडो रुपये खर्च केले जातात. मग कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति झाडामागे पाच हजार रुपये एवढी नुकसान भरपाई म्हणून द्यायला काय हरकत आहे. यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन अत्यल्प झाले असल्यामुळे हापूस आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे केमिकल व पेस्टिसाइड विकणाऱ्या कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांच्या भावना समजून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा तगादा लावू नये तसे आढळून आल्यास आम्ही त्याबाबतीत आक्रमक पवित्रा घेऊ. त्याचप्रमाणे वाशी मार्केट मधील दलाल व अडते यांनी देखील आंब्याचे दर उतरू नये त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना थोडासा तरी दिलासा मिळू शकेल. कोकणातील आंबा उत्पादनाच्या बाबतीत सरकारकडे न्याय मागायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघटित रित्या शासनापर्यंत आपण पोहोचले पाहिजे असे मत माजी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

टिप्पण्या