आजच्या ठळक घडामोडीsu

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं कोल्हापुरात भव्य रॅलीनं जल्लोषी स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपशी जोडणार, युवा मोर्चाचं संघटन मजबूत करणार, कृष्णराज महाडिक यांची माहिती

कोल्हापुरातील मुख्यवस्तीत भरदिवसा धाडसी चोरी, एका महिलेला बोलण्यात गुंतवून पाच महिलांनी घरातील डब्यासह दागिने नेले चोरून, पापाची तिकटी परिसरातील घटना

पन्हाळा बुधवारपेठेत भरधाव कारचा भीषण अपघात, धडकेत टेलीफोनचा खांब फेकला गेला ३० फूट लांब, दोघे गंभीर

चांगभलच्या गजरात आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर झाला चौथा खेटा, गुलालाच्या उधळणीत लाखो भाविक जोतिबारायाच्या चरणी नतमस्तक
वसंत ऋतुची चाहूल, पळस-काटेसावर अशा फुलांना बहर, निसर्गही नटू लागला
इचलकरंजी महापालिकेतील विविध ५ विषय समित्या आणि ४ प्रभाग समित्यांच्या सभापतींची ९ मार्चला निवड
कोल्हापुरातील महात्मा गांधी फौंडेशन आणि अवनि संस्था आयोजित कस्तुरबा गांधी सेंद्रीय शेती प्रकल्प आणि वाळवण महोत्सवात सव्वा लाखांची उलाढाल, शेतकऱ्यांचा झाला गौरव.
लोककलावंतांचं मानधन, आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन
राजकिरण लॅण्डींग चेंजेस इन अॅग्रीकल्चर या कंपनीच्या विरोधात बंडखोर सेनेचं कोल्हापुरात २ मार्च रोजी चिंध्या फाड आंदोलन

भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं कुटुंबियांच्यावतीनं हृदयस्पर्शी स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, औक्षण, मिठाई भरवून कृष्णराज यांच्या निवडीचा महाडिक परिवाराकडून आनंदोत्सव

कागल इथं पहिला राष्ट्रीय धम्म मेळावा उत्साहात संपन्न, डॉ. बाबासाहेबांना शांततेचा नोबेल द्या, परिषदेत ठराव
इस्रायल-इराण युद्धाचा फटका, कोल्हापूरचे २४ विमा प्रतिनिधी दुबईत अडकले, सर्व पर्यटक हॉटेलमध्ये सुरक्षित
इचलकरंजीत कचऱ्यामुळं काळ्या ओढ्याचं अस्तित्व धोक्यात, दुर्गंधीयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं प्रदूषणात भर.

टिप्पण्या