आजच्या ठळक घडामोडी
रिक्षा व्यावसायिकांनी नियमांचं पालन करावं अन्यथा आरटीओ आणि पोलिस दलाकडून कठोर कारवाई होणार, रिक्षा संघटनेच्या बैठकीत पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांचा इशारा
ई चलनाद्वारे होणाऱ्या वाहनांवरील अन्यायकारक दंड आकारणीविरोधात कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार संघटनेकडून झालं चक्काजाम आंदोलन
६ वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, मुलाला खाली पाडून गालाचा चावा घेतल्यानं उमेर बागवान गंभीर जखमी, कुरूंदवाडमधील घटना
इचलकरंजीतील गोळीबार प्रकरणी अनुराग सुर्यवंशी आणि ओमकार शेंडे या दोघा संशयीतांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत इचलकरंजीचा अजिंक्य रेडेकर ठरला महाराष्ट्र श्रीचा मानकरी
सुप्रसिध्द अभिनेते सुनिल बर्वे यांना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान, जयश्री दानवे यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचं झालं प्रकाशन
भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीनं कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद
किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री परप्रांतीय कामगारांनी केला उमेशकुमारचा खून, गोकुळ शिरगांव पोलिसांकडून दोघांना अटक
राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज पहिल्या उपांत्य सामन्यात दिलबहार संघाला टायब्रेकरमध्ये नमवून पाटाकडील संघ अंतिम फेरीत दाखल.
- कोल्हापूरमधील शेंडा पार्क परिसरात ३४.३६ हेक्टरवर होणार आयटी पार्क, एमआयडीसीला जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
- महापौरांनी घेतलेल्या जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद, कोल्हापूरकरांनी वाचला तक्रारींचा पाढा, बांधकाम-पाणीपुरवठा-अतिक्रमणाबाबत सर्वाधिक तक्रारी
- तटाकडील तालीम परिसरातील रस्ता उकरल्यावर गटर्समध्ये सापडल्या तब्बल दोन ट्रॉली भरतील इतक्या प्लास्टिकच्या बाटल्या, बेशिस्त नागरिकांमुळं गटर्स तुंबत असल्याचं सिध्द
- चार दिवसाच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ९०० अंकांनी वाढून गेला ८० हजार १५ वर, तर निफ्टी २८५ अंकांनी वाढून स्थिरावला २४ हजार ७६५ वर, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ६ लाख कोटींची वाढ
- मार्चच्या पहिल्या आठवडयातच महाराष्ट्रातील कमाल तापमान ३९ अंशापर्यंत, पुढील चार दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार, यावर्षीचा उन्हाळा गेल्या १० वर्षाचं रेकॉर्ड तोडण्याची भीती
- सातबारा पत्रकावर नाव लावण्यासाठी शिंगणापूरचे उपसरपंच आणि तलाठी लाच घेताना रंगेहात अटक, कुंपणानंच शेत खाल्ल्याचा प्रकार
- छत्रपती शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक आणि टेक्स्टाईल टुरिझम हब उभारण्यास तत्वतः मान्यता, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची माहिती
- ३० जूनपूर्वी राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेईल, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विधानपरिषदेतील माहितीमुळं शेतकरी कर्जमाफीच्या आशा पल्लवीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा