आजच्या ठळक घडामोडी

          भर उन्हात नागरिकांच्या गॅस सिलिंडरसाठी रांगा, पोलिस बंदोबस्तात सिलिंडरचं वितरण सुरू असतानाही कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादावादी
जिल्ह्यातील गॅस एजन्सी धारकांसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी,                                                   ऑनलाईन नोंदणी केलेल्या ग्राहकांना केवळ घरपोच सिलिंडर मिळणार, सिलिंडरचा साठा किंवा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

         शासकीय धान्य वाहतूक करणारा ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात कागलजवळ झाला अपघात, केरळमधील २७ वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू
           गांधी मैदानमधून जाणारा नाला वळवण्याचं काम संथ गतीनं, कोल्हापुरातील साकोली कॉर्नर परिसरातील रस्ता ६ महिने खोदून ठेवल्यानं नागरिक वैतागले

             युध्दजन्य परिस्थितीचा शेअर बाजाराला फटका, ८२९ अंकांनी घसरून सेन्सेक्स आला ७६ हजार ३४ वर, तर निफ्टी २२७ अंकांनी घसरून २३ हजार ६३९ वर बंद

          पोहाळे तर्फ बोरगावमध्ये बर्निंग ट्रकचा थरार, वाळलेल्या गवताला आग लागल्यानंतर चालकाकडून प्रसंगावधान, अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात
            गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणाऱ्या संकेश्वर ते आंबोली महामार्गामुळं वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी
           व्यसनाधिनता, चुकीचा आहार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि औषधांचा अतिरेक यामुळं बळावतोय किडनी विकार, दरवर्षी देशातील सुमारे १५ लाख व्यक्तींचा मृत्यू, जागतिक किडनी दिनानिमित्त विविध कार्यक्रम 
            कत्तलीसाठी आणलेली जनावरं मोकाट सोडल्यानं सदर बाजार परिसरात वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या, दादागिरी करणाऱ्या बेपारी समाजावर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी.
  • हुपरी परिसरात अंमली पदार्थांची खुलेआम विक्री; कठोर कारवाईच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीचं ठिय्या आंदोलन.
  • कोल्हापूर विभागातील फार्मसी महाविद्यालयांतर्फे 'फार्मा करंडक' सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन.
  • २५० पेक्षा अधिक कंदमुळांचं कोल्हापुरात प्रदर्शन, १४ आणि १५ मार्चला कोल्हापूर वुई केअर संस्थेतर्फे आयोजन.
  • कोल्हापूर महापालिकेची सेवा नियमावली मंजूर व्हावी, या मागणीसाठी काँग्रेस महाविकास आघाडीचं साखळी उपोषण सुरू.
  • वाहनांसाठी लागणाऱ्या एलपीजीचे दर आठ दिवसात दुप्पट झाल्यानं रिक्षाचालक आक्रमक; कदमवाडी रोडवरील गो-गॅस पंपाला घेराव, गॅस वितरण बंद पाडलं.
  • अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या झळा भारतीय लोकांच्या स्वयंपाकघरापर्यंत; होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू.
  • पेट्रोल पंपातून अचानक रस्त्यावर आलेल्या रिक्षाला बुलेटची धडक, दोन्ही वाहनांचं नुकसान, दोन्ही चालक जखमी; कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी चौकाजवळ अपघात.
  • इचलकरंजीजवळच्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील विद्युत ट्रान्स्फार्मरमध्ये शॉर्टसर्कीटनं आग, चौघे गंभीर जखमी.
  • इचलकरंजीतील मुलींच्या कुस्ती स्पर्धेत सोनाली मंडलिककडून विश्व चॅम्पियन पैलवान दीक्षा सिंह चितपट.
  • नवीन रिक्षा परवाना स्थगित करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तीन आसनी रिक्षा संघटनेची मागणी.

टिप्पण्या