आजचे दिनविशेष

            घरगुती  गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळित असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा, पण अनेक गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा कायम, वादावादीचे प्रसंग घडत असल्यानं गॅस एजन्सी कर्मचारी मेटाकुटीला
                        घरगुती गॅस सिलिंडरच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये व्यत्यय, गॅस ग्राहकांचा जीव टांगणीला, मात्र दोन दिवसात भारतात इंधनसाठा पुरेसा होईल, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती

वरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट, शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन

१४ ते १७ मार्च दरम्यान श्री अंबाबाई देवीचा गाभारा भाविकांसाठी बंद राहणार, कलश आणि उत्सव मूर्तीचं दर्शन घेऊन भाविकांना समाधान मानावं लागणार

शेअर बाजारात पडझड सुरूच, सेन्सेक्स १ हजार ४७१ अंकांनी घसरून ७४ हजार ५६३ वर, तर निफ्टी ४८८ अंकांनी खाली येऊन २३ हजार १५१ वर, गेल्या पाच दिवसात सेन्सेक्स ४ हजार ३५० अंकांनी खाली
              कागल तालुक्यातील करनूर गावात हिंदू-मुस्लिम समाजात तणाव, गुरूवारी रात्रीपासून गावात मोठा पोलिस बंदोबस्त, परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यानंतर ५० पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल
        अचानक गॅस टंचाई उद्भवल्यानं केटरिंग व्यावसायिक हवालदिल, विविध समारंभासाठी पारंपारिक उर्जेचा वापर वाढवण्याचा प्रयत्न
चंदगडचा शिमगा म्हणजे लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा, रंगपंचमीला झाली सोंगांची सांगता, पण गुढीपाडव्यापर्यंत चालणार जल्लोष.आजच्या बातम
गॅस टंचाईमुळं इलेक्ट्रिक शेगडी किंवा इंडक्शनच्या मागणीत वाढ, चुलीसाठी लाकडं मिळवण्याकरता नागरिकांकडून वखारीचा शोध सुरु
भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची नवी दिल्लीत भेट

बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत नवे विचारप्रवाह समजून घेण्याची गरज, ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. पी. डी. देवरे यांचं मत, शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय चर्चासत्राला सुरवात

युध्दामुळं निर्माण झालेली गॅस टंचाई कोल्हापुरातील सार्वजनिक अन्नछत्रांच्या मुळावर, श्री महालक्ष्मी अन्नछत्र आणि उत्तरेश्वर थाळी उपक्रमावर गॅस टंचाईचं संकट

जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याबद्दल नामदार हसन मुश्रीफ अजुनही आशावादी
गॅस टंचाईवर उपाय म्हणून शासनानं पूर्ववत रॉकेल साठा उपलब्ध करून द्यावा, रॉकेल विक्रेते आणि रेशन धान्य दुकानदार संघटनेची मागणी
इचलकरंजीत वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघा चोरट्यांकडून १३ बॅटऱ्यांसह १ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त
स्टेशन रोडवर केएमटी बसला लागली शॉर्टसर्किटमुळं आग, प्रसंगावधान राखून वाहक-चालकासह, अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर मिळवलं नियंत्रण.

टिप्पण्या