आल्लापल्लीच्या 'राजे धर्मराव' महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठात रस्ता सुरक्षितता परिषदेसाठी निवड*

*आल्लापल्लीच्या 'राजे धर्मराव' महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठात रस्ता सुरक्षितता परिषदेसाठी निवड* 
दिपक चुनारकर (गडचिरोली )
मुंबई विद्यापीठाच्या दिक्षान्त सभागृहात दि. २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित 'युथ कॉन्क्लेव्ह ऑन रोड सेफ्टी ' या राज्यस्तरीय परिषदेसाठी आल्लापल्ली येथील राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
वाढत्या रस्ता अपघातांच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यासाठी या विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षान्त सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयांतील निवडक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यापीठाने एकूण सहा विध्यार्थ्यांची निवड केली होती त्यात राजे धर्मराव महाविद्यालयातून क्रिष्णा सिडाम (बी. ए. प्रथम तर कु. आशा सैय्यद बी कॉम द्वितीय वर्ष या दोन विद्यार्थ्यांची त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या परिषदेसाठी निवड झाली.
या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद तसेच अल्लापल्ली परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी थेट मुंबई विद्यापीठाच्या व्यासपीठावर जाऊन रस्ता सुरक्षिततेसारख्या महत्त्वाच्या विषयावर प्रतिनिधित्व करणे, ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क -दिपक चुनारकर 9511750860

टिप्पण्या