आजच्या ठळक घडामोडी

घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीचा उडाला भडका, घरगुती गॅस सिलिंडर दरात ६० रुपये, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात ११५ रुपयांची वाढ, गृहीणींबरोबरच हॉटेल-रेस्टॉरंट-छोट्या व्यावसायिकांचं बजेट कोलमडलं
केआयटी कॉलेजचा विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशीकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, गोकुळ शिरगाव पोलिसांनी केली अटक, कॉलेजकडून जोशीवर निलंबनाची कारवाई

विविध योजना आणि प्रकल्पाच्या माध्यमातून कोल्हापूरला राज्याच्या टॉप टेन शहरात स्थान मिळवून देऊ, आमदार राजेश क्षीरसागर यांची ग्वाही
श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून प्रदक्षिणा मार्गावर केला उष्णता रोधक कुल कोट, मराठा अंतप्रेन्युअर्स असोसिएशनचा उपक्रम

चंदगडमधील ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची भीषण अवस्था, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं ऐतिहासिक वारशाचा ऱ्हास

कागल सीमा तपासणी नाका हटावसाठी १६ मार्च रोजी तहसील कार्यालयावर महामोर्चा, कागल इथं सर्वसर्वपक्षीय बैठकीत निर्णय
सोळांकूरमध्ये प्रसुतीदरम्यान विवाहितेचा मृत्यू, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा ग्रामीण रुग्णालयावर मोर्चा
कुख्यात मनिष नागोरीकडुन मिळालेल्या मेफेड्रोन एमडी ड्रग्स गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडं वर्ग

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार.
  • जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीनं नेत्र तपासणी शिबिराला प्रारंभ
  • अमृतपाईप लाईन योजनेच्या कामानंतरच राजारामपुरीतील रस्ते करा अन्यथा महापालिकेला घेराव घालणार, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांचा इशारा
  • कोल्हापूर महापालिकेमध्ये महायुतीत कोणताही राजकीय संघर्ष किंवा मतभेद नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला योग्यवेळी सत्तेमध्ये सन्मान मिळेल, आमदार राजेश क्षीरसागर यांची  माहिती
  • कोल्हापुरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीकडून कोल्हापूर महापालिकेच्या स्मशानभूमीला साडेतीन लाख शेणी दान
  • कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अॅन्ड कल्चर आणि ए जी वेंचर्स प्रस्तुत होलीफेस्टचं मुस्कान लॉनमध्ये आयोजन, रविवारी कोल्हापूरकर अनुभवणार सर्वात मोठी रंगपंचमी

  • कर सल्लागार संघटना आणि जीएसटी सल्लागार संघटनेच्यावतीनं कोल्हापुरात झाली वस्तू आणि सेवा कराबद्दल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा

  • लातूर इथं झालेल्या कराटे डो असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋणमुक्तेश्वर संघाला १९ सुवर्ण, ८ रौप्य, ३ कांस्य पदकाची कमाई
  • कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सुदर्शन जीन्सच्या कापूस गोदामाला भीषण आग, रात्री उशीरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू
  • कागल शहरातील शाहू कॉलनी इथल्या ६१ वर्षीय प्रकाश धोंडिराम कोळेकर या वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या
  • राजेश चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य पाटाकडीलचा तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळावर २-१ गोलनं विजय, विजयानंतर पाटाकडील समर्थकांचा जल्लोष
  • विजेत्या पाटाकडील संघाला सव्वा लाख रुपये आणि राजेश चषक, तर उपविजेत्या शिवाजी तरुण मंडळाला ७५ हजार रुपये आणि चषक.

टिप्पण्या