बातमीपत्र आजचे

              मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी, तर लाडकी बहिण योजना चालूच राहणार, २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दीष्ट
                गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्र लढवणार, विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव दूध संस्थांनी भाजपकडं जमा करावेत, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन

परिवहन सभापती पदावरून महापालिकेतील महायुतीमध्ये पडली वादाची ठिणगी, परिवहन सभापतीपद मिळालं नसल्यानं राष्ट्रवादीचे नगरसेवक नाराज

भारतीय शेअर बाजारातील हेलकावे कायम, दिवसभरात सेन्सेक्स १ हजार ९७ अंकांनी खाली येवून ७८ हजार ९१८ वर, तर निफ्टी ३१५ अंकांनी कोसळून २४ हजार ४५० वर

           केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत कोल्हापूरच्या प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरचे रोहीत मालवेकर, सिध्दार्थ तगड, प्रथमेश शिंदे यांनी घातली यशाला गसवणी.                      युध्दजन्य परिस्थितीमुळं आखाती देशात कांद्यासह शेतमालाची निर्यात ठप्प, कांद्याच्या दरात मोठी घसरण
ब्लास्टिंगमुळं राधानगरी तालुक्यातील कोते परिसरातील अनेक घरांना तडे, रचना कन्ट्रक्शनच्या बेलगाम कामाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी अडवली वाहनं, प्रकल्प व्यवस्थापक धारेवर
            कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचं भवितव्य या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला शिवाजी विद्यापीठात प्रारंभ
         कोल्हापुरातील नागाळा पार्क कमानीची पडझड, कमानीवरील सिमेंटच्या शिटस् कोसळण्याच्या अवस्थेत असल्यानं रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका.                                                                            तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त कोल्हापुरातील यादव महाराज मठीत झाला धार्मिक सोहळा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कारानं गौरव
इचलकरंजी महापालिकेतील ५ विषय समिती सभापती आणि ४ प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल, पदाइतकेच अर्ज दाखल झाल्यानं ९ मार्च रोजी होणार अधिकृत घोषणा
           पेन्शनसह प्रलंबित मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली निदर्शनं
                कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीसाठी भाजपकडून विशाल शिराळे यांचा तर काँग्रेसकडून अमर समर्थ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

                 परिवहन समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे सत्यजीत जाधव, तर काँग्रेसकडून दुर्वास कदम यांचे अर्ज, महिला-बालकल्याण सभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या कौसर बागवान यांचा तर काँग्रेसच्या जयश्री कांबळे यांनी भरले उमेदवारी अर्ज

         कुख्यात पिस्तुल तस्कर मनिष नागोरी याच्या घरावर पोलिसांचा छापा, नागोरीकडुन २६ लाखाचं मेफेड्रोन एमडी ड्रग्स, ४ जिवंत काडतुसं असा ३० लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त
                 छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करावं, लोककल्याण फौंडेशनची क्रीडा उपसंचालकांकडं मागणी
         राजेश चषक फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिवाजी तरुण मंडळाचा, खंडोबा तालीमवर विजय, शनिवारी शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम संघात होणार अंतिम सामना
              शेंडा पार्कमध्ये आयटी पार्कसाठी जागा मंजूर केल्याबददल कोल्हापुरकरांमध्ये राज्य सरकारबद्दल समाधानाची भावना, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अपेक्षा आणि प्रतिक्रिया.

टिप्पण्या