अहेरी धम्मदीक्षाभूमीत "माता रमाई "जयंतीचा उत्साह
अहेरी धम्मदीक्षाभूमीत "माता रमाई "जयंतीचा उत्साह
BY- दिपक चुनारकर
अहेरी येथील बायपास रोड स्थित धम्मदीक्षा भूमी विहारात त्यागमूर्ती माता रमाईची जयंती यशोधरा महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने भाषणे, गीत गायन व भेटवस्तू देऊन उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक मंडळाचे अध्यक्ष रतन दुर्गे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून आलापल्लीच्या प्रसुती रोग तज्ञ डॉ. सुमती खंडाते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष दामोदर राऊत व उपाध्यक्ष अमोल दुर्योधन यावेळी विचार मंचावर उपस्थित होते.
तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा दुर्गे, चालूरकर, ओनडरे सुद्धा उपस्थित होत्या.
दिवसाच्या पहिल्या सत्रात महिला मंडळाच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी सामूहिक वंदना व सुतपठण झाले. त्यानंतर गीत गायनामध्ये त्याग मूर्ती रमाईच्या जीवनावर उत्स्फूर्तपणे महिलांनी भाग घेतला.
गीत गायनामध्ये गीता ओंढरे, दीक्षा खोब्रागडे, कविता बोरकर,अद्विका उराडे यांनी सहभाग घेतला. रमाईच्या जीवनावर मंचावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महिला मंडळाच्या सोनाली शेंद्रे, स्वीटी गजभिये, कमला दुर्गे यांनीही आपले विचार मांडले.
रमाई जयंती निमित्य गितगायन व मनोगत व्यक्त करणाऱ्या महिलांना वंदना सूतपठण पुस्तिका भारतीय बौध्द महासभेच्या वतीने भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमानंतर दानशूर व्यक्तींकडून दिलेल्या सहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. कार्यक्रमाचे संचालन यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता दुर्गे यांनी तर आभार शकुंतला सुखदेवे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा