आजच्या ठळक घडामोडी

कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्यानं ताराबाई पार्कातील महावीर सन्नके यांची पुण्यातील भामट्या दांपत्यानं केली ६१ लाखांची फसवणूक

किरकोळ कारणातून कसबा बावडा इथल्या मातंग वसाहतीतील चौघांवर सशस्त्र हल्ल्याची घटना, संशयिताला अटक करण्याच्या मागणीसाठी महिलांचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईद्वारे सी-टीईटी परीक्षेला प्रारंभ, राज्यभरातून साडेतीन लाख परीक्षार्थीची नोंद

घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हडपण्याच्या प्रकारामुळं इचलकरंजीतील शहापुर पोलिसांचं पितळ उघड, रक्षकच भक्षक बनल्याची स्थिती
           वयोवृध्द, दिव्यांग आणि व्याधीग्रस्त व्यक्तींना घरातून मतदान करण्याची मुभा नसल्यानं अनेकजण मतदानापासून वंचित, मतदारांमधून तीव्र नाराजी
        कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापौर रुपाराणी निकम कार्यरत राहतील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा विश्वास, नूतन महापौरांचं केलं अभिनंदन
         हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीच्या यात्रेला रविवारपासून सुरवात, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.                                                 ....मिनी मंत्रालयाच्या कारभाऱ्यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद, जिल्हयात चुरशीनं अंदाजे ७३ टक्के झालं मतदान, सोमवारी होणार मतमोजणी
           भरधाव वेगातील चारचाकीनं ३ दुचाकींना उडवलं, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तर दोघे जखमी, शाहू मिल ते कोटीतिर्थ रस्त्यावर आज दुपारी घडलेल्या अपघातामुळं शहरात खळबळ

वयोवृद्ध मतदारा सोबत मतदान केंद्रात जाण्याच्या कारणावरून दोन गट भिडले, काही काळ तणावाचं वातावरण, पोलिसांचा लाठीमार, राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथली घटना

गडहिंग्क्ल आरळगुंडी मतदान केंद्राबाहेर पोलिंग एजंटवर प्राणघातक हल्ला, दोघांविरोधात गुन्हा दाखल

करवीर तालुक्यातील तामगावात मतदानाच्या दिवशी रक्तरंजित संघर्ष, कुस्तीच्या मैदानातील लाल मातीवरून कोयता-तलवारीनं केलेल्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी, ग्रामस्थांकडून संशयिताच्या घराची तोडफोड आणि वाहनं पेटवल्यानं प्रचंड तणाव
काळम्मावाडी उपसा केंद्रात विद्युत आयसोलेटर बसवण्याचं काम होणार असल्यानं, ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा होणार कमी दाबानं
शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी या पपिंग स्टेशनमधून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा राहणार सुरू
कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात मतदार यादीतील गोंधळ उघड, निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होईल, नामदार हसन मुश्रीफ यांचा विश्वास.

टिप्पण्या