आजच्या ठळक घडामोडी

               कोल्हापुरातील शाहुपूरी आणि राजारामपुरीला जोडणाऱ्या परीख पुलाचा रस्ता ३ महिन्यानंतर झाला वाहतुकीसाठी खुला, पण पुलाखालील रस्त्याची दुरावस्था कायम असल्यानं वाहनधारकांतून तीव्र नाराजी
             जुना बुधवार पेठेतील मुख्य रस्त्यावरील धोकादायक वाहतुकीविरोधात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा, वाहतूक कोंडीसह अपघात वाढल्यानं नागरिकांमध्ये नाराजी

              भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स २ हजार ७३ अंकांनी वाढून ८३ हजार ७३९ वर, निफ्टी ६३९ अंकांनी वाढून २५ हजार ७२७ वर, गुंतवणुकदार १२.६ लाख कोटींनी मालामाल

           सातबारा पत्रकावरील बोजा उतरवण्यासाठी लाच घेणाऱ्या कोगील बुद्रुक इथल्या विनोद बामणकर या कोतवालाला रंगेहाथ पकडलं, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच झाली कारवाई
           इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान, नितेश पोवार, उदय धातुंडे आणि ध्रुवती दळवाई यांची नावं चर्चेत
             भारत-अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार करार भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर, माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
               शासकीय शिष्यवृत्तीच्या इतकीच स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ठरलीय महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका
               मेंदुतील रक्तवाहिनी फुटून अत्यवस्थ बनलेल्या महिला रूग्णावर सीपीआरच्या इतिहासात अॅन्युरिझमची शस्त्रक्रिया झाली यशस्वी
               छोटया पडद्यावर आणखी एक इतिहास उलगडणार, मी सावित्रीबाई जोतिराव फुले मालिकेतील कलाकार अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले यांचा विश्वास.
  • उत्तराखंडमध्ये झालेल्या पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत आरोही कांबळेनं पटकावलं सुवर्ण पदक, ओडीसा इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
  • कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या कलाकारानं कवडीवर रेखाटलं सौंदत्ती इथल्या रेणुका मातेचं सुक्ष्म चित्र
  • पाचगाव, वसगडे आणि कळंबा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांचा झंझावाती दौरा, भाजपच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद
  • पाठलाग करून मद्य वाहतूक करणारं वाहन पकडलं, मद्य आणि वाहन असा साडेनऊ लाखाचा मुद्देमाल जप्त, चालकाला अटक

  • २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिरूची संस्थेच्या ठोंब्या नाटकाला प्रथम क्रमांक, तर अलंकार कला अकादमी फौंडेशनच्या बालनाट्याला द्वितीय क्रमांक
  • नानीबाई चिखलीच्या शिवानी भोसले यांना ओट्यात घ्या, नामदार हसन मुश्रीफ यांचं भावनिक आवाहन

  • विरोधकांकडं कर्तृत्व नाही तर केवळ पोकळ वक्तृत्व, समरजितसिंह घाटगे यांचा टोला, नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातील जाहीर सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
  • साके इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निघाली भव्य पदयात्रा, भाजपाच्या उमेदवार सुयशा अंबरिषसिंह घाटगे यांनी हळदी कुंकू कार्यक्रमातून महिलांशी साधला संवाद
  • सर्वाधिक मतदान करण्याची कोल्हापूरची परंपरा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही कायम राखावी, प्रत्येक तालुक्यात तीन आदर्श मतदान केंद्र उभारणार, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती
  • भरधाव दुचाकीस्वाराला चुकण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी, इचलकरंजीतील अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी.

टिप्पण्या