क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातून सुप्त गुणांचा विकास -मुख्याध्यापक प्रभाकर भुते

क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातून सुप्त गुणांचा विकास
@ मुख्याध्यापक प्रभाकर भुते 
BY - दिपक चुनारकर
     क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातून विविध विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना चालना मिळून विद्यार्थी व पालकांना उस्फूर्त आनंद व्यक्त होत असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रभाकर भुते यांनी कौशल्यवान राजे धर्मराव हायस्कूल वेलगुरच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणावेळी अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले.
     बक्षिस वितरक तथा मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेलगुरचे मुख्याध्यापक नैनलवार होते.
नुकतेच संपलेल्या तीन दिवस क्रीडा महोत्सव व एक दिवस सांस्कृतिक महोत्सवात वर्ग पाच ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला होता. सांघिक खेळात कबड्डी,व्हॉलीबॉल, लंगडी, क्रिकेट व समूह नृत्याचा समावेश होता तर एकल कौशल्याकरिता मटका फोड, चमचा गोळी, मेणबत्ती स्पर्धा, १०० मीटर धावणे व एकल नृत्त्याचा सहभाग होता.
       सर्व सांघिक व वैयक्तिक खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त राजे धर्मराव हायस्कूल वेलगुरच्या खेळाडूंना विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्यांनी मान्यवरांच्या हस्ते गौरवान्वित करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. 
    यशस्वीतेकरिता जिजा गोहोकार,मारुती दोनाळकर,छोटेलाल चिखलोंढे, अक्षय दिवसे, सुधाकर मडावी यांनी सहकार्य केले.
    कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर झोडे तर आभार संजय गरमाडे यांनी मानले.

टिप्पण्या