आजच्या ठळक घडामोडीs
निवडणुकीसाठी वापरली जाणारी मतदान यंत्रं मंगळवारी सातही महापालिका निवडणूक कार्यालयात पाठवली जाणार, १६ जानेवारीला ३ फेऱ्यांमध्ये ४ ठिकाणी मतमोजणी होणार, दुपारी १ पर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होणार
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत पोलिसांनी दिला डोस, कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कठोर कारवाईची ताकीद
सर्कीट हाऊस परिसरातील ईएसआय हॉस्पिटल मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून पिळवणूक, पगारातून हप्ता द्या अन्यथा नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी
प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रश्नांची भलीमोठी यादी, वर्षानुवर्षे कायम असलेले प्रश्न येत्या निवडणुकीतही चर्चेत, हाय व्होल्टेज लढत असलेल्या प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रखर इच्छाशक्तीची गरज
इचलकरंजीतील वाढती अतिक्रमणं कायमस्वरूपी कधी हटणार, अतिक्रमण हटावच्या मोहिमा म्हणजे निव्वळ फार्स नको, नागरिकांची मागणी
चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग आणि सुंडीगाव परिसरातील खडी क्रशर उद्योगातून ग्रामस्थांचं नुकसान, क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी चंदगड तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचं साखळी उपोषण सुरू
कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर, राहुल गायकवाड, राजकुमार चौगुले, विश्वास दिवे, पांडुरंग पाटील, विकास पाटील आणि महेश कांबळे यांचा विजेत्यांमध्ये समावेश
- सीपीआर मध्ये दोन बालरुग्णांवर झाली बिनटाक्याची मिनिमली इन्व्हेसिव्ह हृदयरोग शस्त्रक्रिया
- चोरीला गेलेले २० तोळे सोन्याचे दागिने आणि ३ दुचाकी संबधित मालकांकडं सुपूर्द, महाराष्ट्र पोलिस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजीत झाला कार्यक्रम
- हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर फाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, सकल हिंदू समाजाची मागणी
- कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक १७ क मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार जहिदा मुजावर यांचा प्रचार जोमानं सुरू
- गेल्या १५ दिवसात १५ लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतलं श्री अंबाबाई देवी दर्शन, कोल्हापूरच्या पर्यटन क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती
- आमदार-खासदारांच्या निधीतून आणि सीएसआर मधून प्रभाग क्रमांक ९ मध्ये झाली विकासाची अनेक कामं, महायुतीच्या चारही उमेदवारांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- कोल्हापुरातील मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्यावतीनं ८ ते ११ जानेवारी या काळात गायन स्पर्धेसह सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन
- २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला कोल्हापुरात सुरवात, पहिल्या दिवशी ६ बालनाट्यांचं झालं सादरीकरण
- कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील काँग्रेसच्या उमेदवार स्वालिया बागवान यांच्या प्रचारासाठी सोमवारपेठ, अकबर मोहल्ला परिसरात निघाली पदयात्रा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा