फायर सेफ्टी केवळ प्रदर्शनापुरतीच? आग लागल्यावर जबाबदारी कोण घेणार? हे आधी ठरवा.

फायर सेफ्टी केवळ प्रदर्शनापुरतीच?
FRESH NEWS
70208 43099 
Fresh News | Breaking | रत्नागिरी

रत्नागिरी शहरात सध्या सुरू असलेल्या व आगामी मोठ्या कार्यक्रमांबाबत अग्निशमन (फायर सेफ्टी) परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशभरात सातत्याने आगीच्या घटना घडत असताना, रत्नागिरीत भरगच्च गर्दी जमवणाऱ्या एक्झिबिशन्स, शॉपिंग फेस्टिव्हल्स, सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांमध्ये अग्निशमन व्यवस्थेची अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

चर्चेनुसार, राजकीय दबाव व नगरपालिका अधिकाऱ्यांच्या कथित सेटलमेंट योजनेतून काही कार्यक्रमांना फायर ब्रिगेडचा दाखला नसतानाही परवानगी दिली जात असल्याची बाब समोर येत आहे. ही स्थिती अत्यंत धोकादायक असून, एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद व पोलीस यंत्रणेवर येऊन ठेपणार आहे.

विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर मॉब (गर्दी) जमा होत असताना—

आरोग्य यंत्रणा,

स्वच्छता विभाग,

अग्निशमन नियंत्रण यंत्रणा


यांची सुस्पष्ट व लेखी परवानगी/तयारी नसल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरत आहे.

कार्यक्रमांचा उद्देश चांगला असला, तरी लोकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?
उद्या एखाद्या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचे प्राण गेले, तर त्या शोकांतिकेची नैतिक व कायदेशीर जबाबदारी कोण स्वीकारणार?
शांती कोणाच्या जीवाला मिळणार?

नागरिकांची मागणी स्पष्ट आहे—
प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमासाठी फायर सेफ्टी, आरोग्य व पोलिसांची सक्तीची, पारदर्शक आणि पडताळणीयोग्य परवानगी द्यावी; अन्यथा कार्यक्रमांना परवानगी नाकारावी.
लोकांच्या जीवाशी तडजोड नको—सुरक्षा आधी, कार्यक्रम नंतर.

टिप्पण्या