आजच्या ठळक घडामोडी

  • व्हाईट आर्मीच्यावतीनं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन
  • वैवाहिक सुख-समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या श्री वेंकटेश्वर पद्मावती विवाह सोहळ्याचं कोल्हापुरात दर्शन
  • समाजाची उन्नती म्हणजेच समाजवाद, भाजप तेच करतोय, त्यामुळं जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी विचारांशी प्रतारणा मानायची नाही, नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचं गडहिंग्लजमध्ये वक्तव्य, जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांचा भाजपमध्ये प्रवेश
  • कर्ज थकबाकीदारांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ठराव
  • कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या कलाकारांचा २६ जानेवारीला दिल्लीत घुमणार डंका, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील २० कलाकार सादर करणार राजपथावर कला
  • जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पतंजली योग परिवाराच्यावतीनं ठिकठिकाणी सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिकं झाली सादर
  • अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि के. एम.टी. उपक्रमाच्यावतीनं प्रवासी दिन उत्साहात साजरा
  • कोल्हापुरातील सिबिक बिझनेस इन्क्युबेटरच्यावतीनं उद्योजकता जागरूकता कार्यक्रम आणि राष्ट्रीय स्टार्टअप दिन उत्साहात साजरा
  • बापानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची मुलीची कागल पोलिस ठाण्यात फिर्याद, संशयितावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
  • सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांचे रोजीरोटीचे प्रश्न सोडवणाऱ्या भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं आवाहन, तुरंबे इथं भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
  • स्वर्गीय माजी आमदार नामदेव भोईटे यांच्या कार्यामुळं राधानगरीत सामान्य माणूस सुखी, माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा भोईटे यांचं मत, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन
  • कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमधील संग्रहालंय खुलं करण्याच्या मागणीसाठी शाहू प्रेमी सोमवारी २६ जानेवारीला करणार उपोषण.

प परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यरत असणाऱ्या भरारी पथकानं वाशीजवळ साड्यांनी भरलेला टेम्पो केला जप्त, मतदारांना वाटण्यासाठी ५ लाखांच्या साड्या आणल्याची चर्चा
पंचगंगा नदीत उडी मारलेल्या महिलेला खाकी वर्दीतील गौतम कांबळे या रक्षकाकडून जीवदान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गौतम कांबळेंचा सत्कार
सलग सुट्टयांमुळं भाविकांची कोल्हापुरात प्रचंड गर्दी, दोन दिवसात दोन लाखापेक्षा अधिक भाविकांची श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी मांदियाळी

संच मान्यतेबाबत राज्य शासनानं लागू केलेले नियम जाचक, त्रुटींमुळं रिक्त राहणाऱ्या शिक्षकांच्या जागा आणि २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचं स्थलांतर करण्याचा निर्णय घातक
आंतरिक उर्जेसह शारीरिक तंदुरूस्तीची गुरुकिल्ली म्हणजे सूर्यनमस्कार, जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त 

विविध भाषेतील कवी-लेखकांच्या उपस्थितीत मानवतावादी साहित्य संमेलन कोल्हापुरात संपन्न, डॉ. सुनीलकुमार लवटे, अॅड. जयंत जायभावे जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित
भरधाव वेगातील ट्रकनं पाठिमागून जोरात ठोकरल्यानं एका पाठोपाठ एक पाच वाहनं एकमेकांना धडकली, तीन वाहनांचं मोठं नुकसान
गडहिंग्लज इथल्या शिवराज विद्या संकुलातर्फे मेधा पाटकर यांना राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार प्रदान
आता तक्रारदारांना ऑनलाईनही तक्रार करता येणार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
सी-टीईटी परीक्षेसाठी मुंबई-गोवा सारखी दूरची केंद्रं मिळाल्यानं स्थानिक परीक्षार्थी उमेदवारांमध्ये तीव्र संताप
प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार दि. २६ जानेवारी रोजी

टिप्पण्या