आजच्या ठळक घडामोडी

  • कोल्हापूरच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी होणार, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग
  • महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला कोल्हापुरात प्रारंभ, बँकांच्या वाढत्या खासगीकरणावर चिंता व्यक्त
  • महाराष्ट्रात इतिहास होईल असा विजय घडवा, नामदार हसन मुश्रीफ, संजयबाबा घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांचं आवाहन, कागल इथं राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडं ३०२ पदापैकी केवळ ८३ कर्मचाऱ्यांवर ४४ उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी, उद्यानांच्या दुरावस्थेबाबत तातडीनं पावलं उचलण्याची गरज
  • पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक कामकाजाच्या प्रशिक्षणासाठी इचलकरंजीत आलेल्यांकडुन अन्नाची प्रचंड नासाडी, कचरा कोंडाळ्यात जेवणाच्या पार्सलचा ढिग, नागरिकांमधून तीव्र संताप
  • शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या आमिषानं कोल्हापुरातील अक्षय ढाले या उद्योजकाची राजस्थानातील अॅक्युलाईट टेक्नॉलॉजी कंपनी कडून सुमारे ७० लाख रूपयांची फसवणूक
  • इचलकरंजी महापालिकेतील भाजपच्या ५ वर्षाच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित, महापौर, उपमहापौरांना १० महिन्यांची संधी
  • महिलांकडं बघण्याचा पुरूषांचा आणि महिलांचाही दृष्टीकोन बदलला तरच समाज बदलेल, शिवाजी विद्यापीठातील सक्षमा कार्यशाळेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं प्रतिपादन
  • कोल्हापूर महापालिकेतील भाजप गटनेत्यासाठी कोअर कमिटीकडून राज्यस्तरीय नेतृत्वाकडं ४ नावांची शिफारस, मुरलीधर जाधव यांचं नाव आघाडीवर
  • इचलकरंजीत दुचाकीच्या जोरदार धडकेत वृद्धाचा मृत्यू, तर थांबलेल्या टेम्पोला चारचाकीनं पाठीमागून जोरानं धडक दिल्यानं टेम्पो आणि चारचाकीचं मोठं नुकसान
  • नागरिकांच्या समस्यांचं निराकरण आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याला नगरसेवकांनी प्राधान्य द्यावं, आमदार राजेश क्षीरसागर

  • हातकणंगले तालुक्यातील मिणचे इथल्या संस्थेत ५० लाख रुपयांची पिग्मी अडकली, पैसे देण्यास संस्थेकडून टाळाटाळ, सहाय्यक निबंधकांकडं लेखी तक्रार दाखल
  • जमिनीवरील अतिक्रमण, नोकरीचं आमिष आणि डेअरीसाठी कर्ज देण्याच्या आमिषानं फसवणूक झालेल्या विविध व्यक्तींचा प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा
  • केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहारवर बालगोपाल संघाचा, तर सुभाषनगरचा पाटाकडीलवर विजय
  • यावर्षीचं भिमा कृषी प्रदर्शन ६ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार, प्रदर्शनाच्या तयारीसाठी झाली आढावा बैठक.

टिप्पण्या