आजच्या ठळक घडामोडी
निगेटिव्ह नॅरेटिव्हच्या बादशहाचं फ्रंट डोअरचं राजकारण कोल्हापूरच्या जनतेनं संपवलं, आमदार राजेश क्षीरसागर यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर बोचरी टीका
महायुतीच्या नेत्यांनी एकदिलानं प्रचार केल्यामुळचं कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकला, पाच वर्षात शिवसेनेलाही कोल्हापूरचं महापौर पद मिळेल, आमदार क्षीरसागर यांचा विश्वास
दरवाढीची एक्सप्रेस सुसाट... सोन्याचा दर गेला १ लाख ६० हजार रुपयांवर, तर चांदी पोचली ३ लाख ३० हजारावर, दराचा फुगवटा की दीर्घकाळ दरवाढ टिकून राहणार याबद्दल मात्र संभ्रम
कोल्हापूर महापालिकेतील नूतन नगरसेवकांच्या मानधनापोटी दरवर्षी होणार ७१ लाख रुपयांचा खर्च, सभागृहाच्या नूतनीकरणावर ४० लाख रुपये खर्च होणार, तर पदाधिकाऱ्यांसाठी नव्या गाड्या येणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात झुंबड, जिल्ह्यात बनली सोयीची राजकीय समीकरणं
भरधाव ट्रकची मोटरसायकलला धडक, कणेरीवाडी इथल्या ४१ वर्षाच्या अमोल नामदेव आयवळे यांचा जागीच मृत्यू, कागल जवळच्या झालेल्या अपघातात ट्रक चालकाला अटकवाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ६५१ वाहनधारकांवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई, २ दिवसीय कारवाईत ५ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा आकारला दंड
महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या कामाचं आशा सेविकांना मानधन द्यावं, भारतीय मजदूर संघाच्यावतीनं झालं महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन
कोल्हापूर महानगरपालिकेनं अनुदान थकवल्यानं दिव्यांग हवालदिल, प्रशासनानं तातडीनं अनुदान देण्याची मागणी
सर्टिफिकेट कोर्स इन हायकोर्ट प्रॅक्टिस या अभ्यासक्रमाची कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये सुरवात
प्रभाग क्रमांक नऊ मधील महायुतीच्या विजयी उमेदवारांचा भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झाला सन्मान
कोल्हापूर जिल्हा पोलिस दल आणि बँक ऑफ इंडिया यांच्यात झाला सामंजस्य करार, वेतन खात्यावर बँकेकडून मोफत विमा संरक्षण
शाहू जन्मस्थळाच्या आवारातील वस्तू संग्रहालय जनतेसाठी खुलं करा, अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषण करणार, मराठा महासंघाच्या वसंतराव मुळीक यांचा इशारा
आमदार राहुल आवाडे यांच्या कन्येची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी, घराणेशाहीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये चर्चा, मोसमी आवाडे यांचा डमी अर्ज
कधी अमर्यादित आनंद, तर कधी क्षणाक्षणाला मृत्यूची भीती, अशा अनुभवांमुळं जगण्याचं महत्व कळालं, कनवा व्याख्यानमालेत शुभदा आणि प्रसाद गोडबोले यांनी उलगडला अनुभवाचा खजिना
श्रीमंत शाहू छत्रपती केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम मंडळ आणि प्रॅक्टिस क्लबचा विजय
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दुचाकी आणि टेम्पोची समोसमोर धडक, खुपिरे येथील युवक ठार, तर एक जण गंभीर जखमी
कागल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आखाड्यात मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे गट एकत्र, प्रत्येक निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलत असल्यानं कार्यकर्तेही अचंबित
राज्यासह देशातील हवामानात मोठे बदल, पुढील तीन दिवस हिमाचल आणि जम्मू काश्मिरमध्ये प्रचंड हिमवर्षाव होण्याची शक्यता, २६ जानेवारीनंतर पुन्हा एकदा राज्यात थंडीची लाट येण्याची चिन्हं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा