आजच्या ठळक घडामोडी
कोल्हापूर महापालिकेसाठी एकटा लढलो, असं सांगणारे आमदार सतेज पाटील काँग्रेसच्या यशाचं श्रेय खासदार शाहू छत्रपती यांना का देत नाहीत, खासदार धनंजय महाडिक यांचा सवाल
महापालिका म्हणजे व्यवसाय नाही, तर जनसेवेचं माध्यम, प्रामाणिकपणानं काम करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इचलकरंजीतील नूतन नगरसेवकांना सल्ला
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चंबुखडी टाकीला मोठी गळती, रस्त्याला ओढ्याचं स्वरूप तर अनेक घरात घुसलं पाणी
सोने-चांदी दरवाढ सुसाट, दिवसभरात सोने दरात ४ हजारानं, तर चांदी दरात तब्बल २० हजार रुपयांनी वाढ, चांदीचा दर गेला ३ लाख १३ हजार रुपये प्रतिकिलो
सेन्सेक्स १ हजार ६५ अंकांनी खाली येवून ८२ हजार १८० वर, तर निफ्टीमध्ये ३५३ अंकांची घट,
- भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या फिट इंडिया चळवळीअंतर्गत श्री सत्यसाई यांच्या जन्म वर्षानिमित्त पार पडली मॅरेथॉन स्पर्धा
- संघ कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, प्रेम, सेवा आणि राष्ट्र भावनेचं कार्य करत समाजात सकारात्मक बदल घडवणं हा संघाचं मुख्य उद्देश, अॅड. दिनकरराव कांबळे यांचं प्रतिपादन
- कोल्हापुरातील टाऊन हॉलमध्ये रंगली मैफल रंगसुरांची, श्रीकांत जाधव यांना रंगबहार जीवन गौरव पुरस्कार प्रदान
- कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातून सौ. शौमिका महाडिक यांनाच उमेदवारी द्यावी, ८ गावच्या नागरिकांची खासदार धनंजय महाडिक यांच्याकडं मागणी
- कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाडचा सांगलीमध्ये हृदयविकारानं मृत्यू
- इचलकरंजी महापालिकेत सक्षम विरोधी पक्ष म्हणुन काम करणार, शिव-शाहू विकास आघाडीच्या नेत्यांची ग्वाही
- निसर्गमित्र परिवार आणि आदर्श सहेली मंचच्यावतीनं देशी बी-बियाणांच्या वाणाची झाली देवाण-घेवाण, संक्रांती निमित्त राबवला महत्वाचा उपक्रम.
निर्माण चौक ते जरगनगर रस्ता रुंदीकरण झालं, पण रस्त्याच्या मधील खांब हलवले नसल्यानं अपघाताचा धोका
एक वर्षाच्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनची प्रतिमा आणि प्रतिष्ठा उंचावल्याबद्दल माजी अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांचा विशेष सत्कार
गोकुळ शिरगाव परिसरात गांजा विक्रेत्यावर गुन्हे शाखेची कारवाई, २ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा