आजच्या ठळक घडामोडी

  • राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, कोल्हापूर महापालिकेत इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील नगरसेवकांना मिळणार महापौरपद
  • इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर, महापौर निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान
  • कोल्हापूर-इचलकरंजीमध्ये महायुतीचाच महापौर होणार, महायुतीमध्ये कोणतेही राजकीय मतभेद नाहीत, खासदार धनंजय महाडिक यांचा निर्वाळा
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण, अर्ज माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार
  • अणुस्कुरा फाटा इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, १ कोटी १५ लाख रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या मद्यासह कंटेनर केला जप्त, राजस्थानमधील चालकाला अटक
  • सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या कामांच्या गुणवत्तेत तडजोड चालणार नाही, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचे निर्देश
  • ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापुरात भरणार दालन प्रदर्शन, बांधकाम क्षेत्रातील नव तंत्रज्ञान आणि वास्तू विषयक प्रकल्पांची एकाच छताखाली मिळणार माहिती
  • बुध्दीची देवता अशी ख्याती असणाऱ्या श्री गणेशाची माघी जयंती मोठ्या भक्तीभावानं साजरी, जन्मकाळ सोहळ्यासाठी ठिकठिकाणी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी, तर अनेक ठिकाणी महाप्रसादाचं वाटप.                           .शहर विकासाची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर नागरिकांनी दबाव आणणं गरजेचं, ज्येष्ठ संपादक डॉ. वसंत भोसले यांचं मत
    कोल्हापुरात २५ जानेवारी रोजी होणार अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलन
         भरदिवसा पाईपलाईन टाकण्यासाठी सर्वात वर्दळीचा रस्ता खोदल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी, नव्यानं केलेला शिवाजी पार्कातील एलिक्झा पार्क ते छत्रपती ताराराणी चौक रस्ता पुन्हा उकरला

    गडहिंग्लज तालुक्यातील जनता दलाच्या नेत्या प्रा. स्वाती कोरी यांचा २५ जानेवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

    अंधारलेल्या काळात संविधान हाच जागता विवेकदीप ठरेल, राजर्षी शाहू व्याख्यानमालेत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचं प्रतिपादन

    इचलकरंजीजवळच्या कोरोची आणि शहापूरमध्ये चोरी, ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सव्वापाच लाखाचा ऐवज लंपास
    मरळी इथं सापळा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दोन लाखांचं मद्य आणि दीड लाखांचा टेम्पो पकडला, चालकाला अटक
    कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले आणि पंचगंगा हॉस्पिटलमध्ये मेनोपॉज विशेष क्लिनिक सुरु
              केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील आणि शिवाजी तरुण मंडळातील सामना बरोबरीत, तर बलाढ्य फुलेवाडी संघावर संध्यामठ तरुण मंडळाचा एकतर्फी विजय
           जमीन मोजणी, हद्दी ठरवणं आणि अंतिम नकाशा देण्यासाठी ३ हजाराची लाच स्विकारताना चंदगड भूमी अभिलेख कार्यालयातील खाजगी व्यक्ती विजय कानडेला अटक.

टिप्पण्या