आजच्या ठळक घडामोडी

.
लेबल महाराष्ट्राचं अन् दारू गोव्याची, मद्य, ट्रक आणि मोबाईल असा ६१ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त, कागल तालुक्यातील बस्तवडे इथली राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
कागल नगरपरिषदेच्यावतीनं आयोजित राजर्षि शाहू व्याख्यानमालेत, आनंदी आणि तणावमुक्त जीवन या विषयावर डॉ. मनीषा भोजकर यांचं व्याख्यान

निरोगी जीवनासाठी संतुलित आहाराबरोबरच दररोज चालण्याची गरज, सुप्रसिध्द आहार तज्ञ अमिता गद्रे यांचा सल्ला

तंत्रशिक्षण संचालनालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं रजा रोखीकरणाच्या बिलांसाठी जिल्हा कोषागार कार्यालयासमोर उपोषण
निवडणुकीच्या वादातून इचलकरंजीतील दोन गटात सशस्त्र हाणामारी, ३ वाहनांचं नुकसान, २१ जणांवर गुन्हा दाखल

तब्बल ५ वर्षानंतर कोल्हापूर महापालिकेचं सभागृह अस्तित्वात येत असल्यानं शाहू सभागृहासह सर्व कार्यालयांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
कागलमधील मुजावर गल्लीतील ४५ वर्षाच्या उस्मानगणी पापालाल नायकवडी यांचा विहिरीत पडून मृत्यू
प्रसार माध्यमांसाठी आयोजित आसमा चषक क्रिकेट स्पर्धा खेळीमेळीत संपन्न, दैनिक सकाळनं पटकावलं विजेतेपद, तर आसमा संघ उपविजेता
शिवाजी तरुण मंडळाचा खंडोबा तालमीवर विजय, तर फुलेवाडी संघाची झुंजार क्लबवर मात, फुलेवाडी आणि झुंजार क्लबच्या सामन्यात खेळाडूंमधील हाणामारीमुळं ९ खेळाडूंना रेड कार्ड, तर अन्य १४ खेळाडूंना यलो कार्ड.राज्यातील २९ महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला निघणार, नूतन नगरसेवकांचं लक्ष आता मुंबईकडं
भुदरगड तालुक्यातील कूर कालवा ओव्हरफ्लो, दारवाड परिसरातील ६० एकर शेती क्षेत्रात घुसलं पाणी, पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप
टीईटी परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर, यंदाच्या निकालात १० टक्क्यापर्यंत वाढ, मात्र केवळ एक गुणानं अनुत्तीर्ण झालेले उमेदवार चिंताग्रस्त

४० हजार रूपयांची लाच घेताना मुरगूड नगरपालिकेचे नगरअभियंता प्रदीप देसाई यांना रंगेहाथ पकडलं, लाचखोर देसाई यांच्या कार्यालयासह घराची झडती

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, कुठं साधेपणानं, तर कुठं शक्ती प्रदर्शनातून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात

राजाराम बंधारा ते निगवे रोडवर दुचाकी विक्रीसाठी आलेल्या अभिषेक कुरणे आणि एका अल्पवयीन मुलाला करवीर पोलिसांनी घेतलं ताब्यात, चोरीच्या ११ दुचाकी जप्त
तणावपूर्ण परिस्थितीत मतमोजणीचं काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळतो अत्यल्प निवडणूक भत्ता, अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
अमावस्येच्या दिवशी संत बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास, सुमारे पाच तास प्रचंड वाहतूक कोंडी, आदमापूर मधील वाहतूक कोंडीवर ठोस उपाय योजना करण्याची गरज
      

टिप्पण्या