आजच्या ठळक घडामोडी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम दोन दिवसांनी पुढे ढकलला, आता ७ फेब्रुवारीला मतदान तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार
इचलकरंजी महापौर आणि उपमहापौर निवड होणार ९ फेब्रुवारीला, नेत्यांची खलबतं तर इच्छुकांच्या जोडण्या सुरू

वाढता वाढता वाढे... सोनं-चांदी दरवाढ कायम, सोन्याचा दर गेला १ लाख ८२ हजार रुपये प्रतितोळा, तर चांदी प्रतिकिलो ३ लाख ९५ हजार रुपये, भल्या भल्यांना दरवाढीचा अंदाज येईना

कोल्हापुरातील रंकाळ्यावरील पदपथावर असलेल्या लोकांच्या वर्दळीमुळं पक्षांच्या संख्येवर विपरित परिणाम, बर्डस ऑफ कोल्हापूरच्या सर्वेक्षणाचा अहवाल

साश्रू नयनांनी अजितदादांना अखेरचा निरोप, शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात झाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार, केंद्रीय गृहमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती
शिंगणापूरकडं चालत निघालेल्या विशाल शिंदे या तरूणाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू, संतप्त जमावाकडून कारची तोडफोड
मोटरसायकल घसरून रस्त्यावर पडलेल्या तरूणाच्या पायावरून गेला ट्रक, कागल-निढोरी रस्त्यावर झालेल्या अपघातात ३० वर्षाच्या चंद्रशेखर चव्हाणचा मृत्यू, रस्ता खुदाईच्या कामामुळं घडली दुर्घटना
कोल्हापूर जिल्ह्यात झालं १ कोटी ९ लाख ८७ हजार १८८ मेट्रिक टन उसाचं गाळप, तर १ कोटी २१ लाख ३ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन, साखर उताऱ्यात वारणेचा तात्यासाहेब कोरे कारखाना नंबर वन.
  • अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोल्हापुरातील महम्मदतुल्ला शेख याला न्यायालयानं सुनावली २० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा
  • भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकानं मतदान नोंदणी आणि मतदानाचा हक्क राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बजावावा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन
  • बांधकाम व्यावसायिक उत्तम फराकटे यांनी लिहिलेल्या अमेरिका नऊवारी या पुस्तकाचा झाला प्रकाशन सोहळा
  • ऑनलाईन व्यवहार करताना चुकून खात्यावर आलेले एक लाख रुपये रिक्षा चालकानं केले प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत, अपर पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांच्याकडून रिक्षा चालकाचा झाला सन्मान
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एक पिस्तुल, दोन मॅगझीन, १४ काडतुसं, ३० हजार लिटर दारु आणि ४ हजार ८०० डिटोनेटर्स जप्त
  • कृष्णराज महाडिक फौंडेशनच्यावतीनं कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाली एआय अॅन्ड रोबोटीक्स कार्यशाळा
  • केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टीस क्लबची पाटाकडीलवर एकतर्फी मात, तर वेताळमाळचा दिलबहारवर विजय
  • सुयशा अंबरिशसिंह घाटगे आणि सुवर्णा पाटील या आदर्श सुनबाई राज्यात विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील, नामदार हसन मुश्रीफ यांच्या सिद्धनेलीं प्रचार सभेला मोठा प्रतिसाद.

टिप्पण्या