आजच्या ठळक घडामोडी
- कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चुरशीनं सुमारे ७० टक्के झालं मतदान, संपूर्ण राज्यात कोल्हापूर आघाडीवर
- मतदार यादीतील घोळाचा फटका अनेक मतदारांना, यादीत नावच नसल्यानं अनेकजण मतदानापासून वंचित
- महापालिका निवडणुकीसाठी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, राजेंद्रनगर आणि कॉमर्स कॉलेज केंद्रावरील किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत
- १६ जानेवारी, काँग्रेस कायमची घरी... असे फलक शुक्रवारी कोल्हापुरात झळकणार, खासदार धनंजय महाडिक यांचा टोला
- शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, शहरात ४ ठिकाणी होणाऱ्या मतमोजणीतून दुपारी १ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता,
- इचलकरंजी महापालिकेसाठी सुमारे ६८ टक्के चुरशीनं मतदान, काही मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू
- मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी उन्हाळ्याची चाहूल, ढगाळ हवामानासह हवेतील उष्मा वाढला, शनिवारपर्यंत निम्म्या महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता. महापालिका निवडणुकीत बोटावर शाई लावण्यासाठी वापरलेला मार्कर वादग्रस्त, आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पूर्वीप्रमाणं शाई वापरणार, मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहितीकोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीनं एकल माता पाल्य सर्वेक्षण पूर्ण, पहिली ते बारावीपर्यंत ७ हजार पेक्षा अधिक एकल माता पाल्य घेतायत शिक्षणअंशकालीन परिचारिकांना किमान वेतन द्यावं आणि त्यांना जिल्हा परिषदेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घ्यावं, अंशकालीन परिचारिकांची मागणीप्रयोगशाळा नियंत्रण आणि नियमन कायदा येत्या अधिवेशनात मंजूर करणार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाहीजिल्हा परिषद आरोग्य सोसायटीच्या सभासदांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद, रंगकर्मी प्रशांत जोशी यांचा झाला विशेष सन्मानमुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्याकडून शहरातील विविध मतदान केंद्रांची पाहणीप्रमुख राजकीय नेत्यांनी बजावला महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क, सर्वांचाच विजयाचा दावामहापालिकेच्या मतदान केंद्रावर प्रशासनाकडून विविध सुविधा, प्रथमोपचार-व्हिलचेअर आणि दिव्यांग आणि वृध्द मतदारांसाठी रिक्षाची सोय, मात्र पाळणा घराची सुविधा नाही
- विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या त्या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करा, पोलिस ठाण्यात निवेदन देवून मुरगुडवासीयांचा संताप.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा