मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पाच ग्रामपंचायतीमधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आढावा
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पाच ग्रामपंचायतीमधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आढावा
By-दिपक चुनारकर (गडचिरोली)वेलगूर14jan 2026
ग्रामपंचायतींना सक्षम करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधने, पायाभूत सुविधा सुधारणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि ग्रामविकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चालू आहे. याचा आढावा जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी खमणचेरू, महागाव बुज., देवलमारी, मेडपल्ली आणि पेरमिली येथील ग्रामपंचायतच्या कामांचा आढावा व मार्गदर्शन केले.
सदर अभियानात आरोग्य, शिक्षण, उपजीविका व सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. यातून स्थानिक ग्रामपंचायती अंतर्गत बचत गट, कुशल कारागीर व त्यांच्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी लोकसहभागातून चळवळ उभी करण्यासाठी व संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा आढावा घेतला.
देवलमारी येथे महिला बचत गटांना मार्गदर्शन, ग्रामपंचायती द्वारे निर्मित सुसज्ज ग्रंथालय, कचराकुंडी व महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन यावेळी अधिकाऱ्यांच्या व सरपंच कन्नाके, ग्रामविकास अधिकारी धुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
अभियानातून ग्रामपंचायतचे सक्षमीकरण, शाश्वत ग्रामीण विकास, लोकांचा सहभाग, योजनेची प्रभावी अंमलबजावणी व मूल्यमापन आणि प्रोत्साहन देण्यासाठी 17 सप्टेंबर 2025 पासून सदर अभिमान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचे केंद्रबिंदू ग्रामीण भाग असून समृद्ध व विकसित होण्यासाठी पाचही ग्रामपंचायत येथील गावकऱ्यांची सभा घेऊन मार्गदर्शन केले.
ग्रामविकास अधिकाऱ्यांनी याची अंमलबजावणी पुढील काळात लोकसहभागातून करण्याचे निर्देश दिले. मुख्य अधिकाऱ्यासोबत पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चव्हाण, ग्राम विस्तार अधिकारी व संबंधित ग्राम विकास अधिकारी, सरपंच उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा