वेलगुरच्या विद्यार्थ्यांना सहलीतून मिळाला सर्वांगीण अनुभव
वेलगुरच्या विद्यार्थ्यांना सहलीतून मिळाला सर्वांगीण अनुभव
By- दिपक चुनारकर
विद्यार्थ्यांना पुस्तकि ज्ञानापुढे जाऊन जीवनात अभ्यासक्रमासोबतच प्रत्यक्ष अनुभवांची शिदोरी मिळावी यासाठी मुख्याध्यापक प्रभाकर भुते यांच्या नेतृत्वात राजे धर्मराव हायस्कूल वेलगुरची एक दिवशिय शैक्षणिक सहल ऐतिहासिक, वैज्ञानिक व भौगोलिक स्थळांना भेटी देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
Bbbb विसापूरच्या बॉटनिकल गार्डन मधून विविध प्रकारचे झाडे,वेली, पक्षी, प्राण्यांचे निरीक्षण केले. यातून निसर्गाची निरीक्षण, विविधता व त्यांचे महत्त्व अप्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले.
वरोरा येथील महारोगी सेवा समितीद्वारे निर्मित हस्तकला, चित्रकला, हातमाग, प्रिंटिंग कला इत्यादींचा प्रत्यक्ष पाहुन कलेचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
भद्रावती येथील प्राचीन मंदिर,बुद्ध लेणीला भेट देण्यात आली. यातून लेण्याचा इतिहास, त्यांचे बांधकाम व तत्कालीन जीवनशैली याबद्दल सविस्तर माहिती देऊन प्रत्यक्ष इतिहासाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
केवळ फिरणे हा शैक्षणिक सहलीचा उद्देश नसून यातून इतिहास,भूगोल व निसर्गाबद्दल प्रत्यक्ष अनुभव मुलांना मिळाले. त्यांच्या ज्ञानात भर, निरिक्शन शिक्षकांनी घातल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक ठरणार आहे.
एकत्र गप्पा, मैत्री, जीवनातून एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती विकसित झाली. सहलीसाठी संजय गरमाडे, नंदकिशोर झोडे, जिजा गोहोकर व अन्य शिक्षकांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा