आजच्या ठळक घडामोडी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा कर्तव्यनामा जाहीर, पायाभूत भौतिक सुविधांबरोबर माणूस केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या योजना अमंलात आणणार, तिन्ही पक्षांचा निर्धार
कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगांनं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, एक हजार पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी आणि तेराशे होमगार्ड तैनात

काळाच्या ओघात निवडणुकीच्या प्रचाराची साधनं आणि पध्दतही बदलली, पारंपारिक माध्यमांसह सोशल मीडियाचा वाढता वापर, निवडणुकीचे नवे फंडे
या आठवडयात शेअर बाजारात घसरण, दिवसभरात सेन्सेक्स ६०४ अंकांनी खाली, तर निफ्टी १९३ अंकांनी घसरला, गेल्या पाच दिवसात सेन्सेक्समध्ये २२०० अंकांची घसरण

कोल्हापुरातील सिंधी समाजाचा महायुतीला शंभर टक्के पाठींबा जाहीर, महायुतीला मिळालं शंभर हत्तींचं बळ, नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

रविवारी झालेल्या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या हुपरी विभागाचे उप कृषी अधिकारी राहुल कुलकर्णी यांचा उपचारादरम्यान मृत्यू, कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील हेरले फाटा इथली दुर्घटना
केखले गावातील दवणा वनस्पतीचं पेटंट घेणार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही
प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपच्या उमेदवार निलिमा पाटील यांना ३८ मंडळं आणि २८ बचत गटांचा जाहीर पाठींबा, महिलांचा प्रचारात वाढतोय सहभाग
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचं अनोखं शपथपत्र
निगर्वी आणि संयमी व्यक्तीमत्व असलेल्या काँग्रेसचे उमेदवार प्रवीण केसरकर यांना मतदारांची पसंती, प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रविण केसरकर यांचाप्रभागाच्या विकासाचा रोड मॅप निश्चित असलेल्या आणि समाजाशी बांधिलकी जपलेल्या राहुल चिकोडे यांना कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक १९ अ मध्ये मोठा प्रतिसाद
केंद्रात आणि राज्यात सत्ता नसताना काँग्रेस विकास निधी आणणार कसा, नामदार हसन मुश्रीफ यांचा सवाल
प्रभाग क्रमांक २० मधील प्रलंबित कामांना गती देवू, राजू दिंडोर्ले यांची ग्वाही

सामाजिक कार्याचा वारसा असलेल्या काँग्रेसचे माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांचा झंझावाती प्रचार, कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक १९ मधील महाविकास आघाडीचे उमेदवार एकसंध

कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी जनसुराज्य शक्ती पक्ष वचनबध्द, प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवारांची ग्वाही
समाजकल्याण विभागाच्या चार शासकीय निवासी शाळांतील ७२ विद्यार्थी इस्त्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी हैदराबादला रवाना, कोल्हापूर विमानतळावर विद्यार्थ्यांचं प्रशासनाच्यावतीनं स्वागत

ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेसकडून झालेल्या फसवणुकीतील मुख्य आरोपी विश्वास कोळी यानं जामिन अर्ज घेतला मागे, फॉरेन्सिक ऑडिट करणार असल्याची पोलिसांची माहिती
शाहूनगर परिसरातील जळीतग्रस्त कुटुंबाला नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची भेट, नुकसानीची माहिती घेवून दिला आधार
कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग क्र. २० मधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या डॉ. नेहा तेंडुलकर यांच्या मोहिते कॉलनी परिसरातील पदयात्रेला मतदारांचा प्रतिसाद
कोल्हापूर महापालिका प्रभाग क्र. ४ मधील भाजपचे उमेदवार दिलीप पोवार यांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत कनाननगरमध्ये झाली सभा
राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथल्या २८ वर्षीय उदय बरगे आणि १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दुर्गमानवाड जंगलात केली आत्महत्या. वेगवान प्रचार.

टिप्पण्या