आजच्या ठळक घडामोडी

अचानक लागलेल्या आगीत सय्यद कुटुंबियांचं प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान, घरात सिलेंडरचा स्फोट झाला तरी सुदैवानं जिवितहानी टळली, कोल्हापुरातील शाहूनगर परिसरातील दुर्घटना
कोल्हापूर शहरातील गल्ली-बोळात फुटलंय अनधिकृत यात्रीनिवासचं पेव, धोकादायक आणि असुरक्षित यात्री निवासवर महापालिका प्रशासनानं कारवाई करण्याची गरज
भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आजमावली मतं
भिन्न आर्थिक स्तरावरील लोकवस्तीच्या अपेक्षा आणि समस्याही वेगवेगळ्या, देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात अजुनही मुलभूत सुविधांची वानवा, प्रभाग क्रमांक १६ चा पंचनामा

कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक १७ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झाली विजयी निर्धार सभा, महापालिकेत महायुतीला सत्ता द्या, रखडलेली सर्व विकासकामं पूर्ण करू, खासदार महाडिक यांचं आश्वासन

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता उपलब्ध होणार आधुनिक पध्दतीची स्वच्छतागृहं, कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल कॉम्प्लेक्सचा प्रयोग ५४ शाळांत यशस्वी
अंगारकी संकष्टीनिमित्त ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांची गर्दी, आकर्षक पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अॅनालिसीस अॅन्ड प्रॅक्टीशनर्स संघटनेच्यावतीनं १० आणि ११ जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठात स्वर्गीय अण्णासाहेब करोले स्मृती परिषदेचं आयोजन
जिल्हयातील अनुसूचित जातीच्या निवासी शाळेतील ७२ विद्यार्थी इस्त्रोच्या हैद्राबादमधील स्पेस सेंटरला देणार भेट, जिल्हा नियोजन समितीचा उपक्रम
प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार जहिदा मुजावर यांनी साधला महिला मतदारांशी संवाद, प्रभागात महिलांसाठी गारमेंट पार्क उभारण्याचा निर्धार.आजच्या बातमीपत्रात पहा...
भोगावती साखर कारखान्याजवळच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला शॉर्टसर्किटनं आग, २५ लाखांचं नुकसान
मराठी पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये विविध संस्था-संघटनांकडून माध्यमकर्मीचा गौरव
रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, भाजी मंडई अशा सार्वजनिक ठिकाणाहून गहाळ झालेले ३ लाख १५ हजाराचे २१ मोबाईल शाहूपुरी पोलिसांनी केले मूळ मालकांना परत
अंगारकी संकष्टीला लालपरीची गणपतीपुळेला भक्तिमय धाव, कोल्हापूर विभागाच्या विशेष एस.टी. सेवेनं भाविकांची सोय
उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव जाणवणार, ९ ते १५ जानेवारीदरम्यान महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
प्रभाग क्रमांक १७ मधील काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रवीण केसरकर यांना विक्रमनगर, टेंबलाईवाडी परिसरातून वाढता पाठिंबा


२५ हजार लोकवस्तीसाठी वाचनालय आणि झोपडपट्टी परिसरातील प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न निकाली काढणार, आमदार अमल महाडिक यांचं आश्वासन
महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन झाल्याशिवाय कोल्हापूरसह जिल्हयाचा विकास होणं अशक्य, एस फोर ए विकास आघाडीचे अध्यक्ष राजू माने यांचं मत
शहराच्या प्रश्नांची जाण असणारा आणि ते सोडवण्याची धमक असणारा उमेदवार म्हणून मतदारांनी पाठबळ द्यावं, प्रभाग क्र. १० चे काँग्रेसचे उमेदवार दत्ताजी टिपुगडे यांचं आवाहन
गेले अनेक वर्षे प्रभागात केलेल्या मदत कार्यामुळं आणि आमदार-खासदारांच्या निधीतून केलेल्या विकासकामांमुळं आपला विजय निश्चित, प्रभाग क्र. १४ च्या नीलिमा पाटील यांचा विश्वास
प्रभाग क्रमांक २० च्या भाजपच्या उमेदवार नेहा तेंडुलकर यांची दत्त कॉलनी, माऊली नगर, डायना कॅसल आणि फुलेवाडी रिंगरोड परिसरात पदयात्रा, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

टिप्पण्या