नवीन वर्षाच्या ठळक घडामोडी
एसटी बसची वाट बघत तावडे हॉटेल चौकात रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांचा भरधाव कारनं चिरडल्यानं मृत्यू, तर अन्य तीन ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा अंत, एकूण दोघे जखमी, नववर्षाचा पहिलाच दिवस ठरला घातवार
आमदार सतेज पाटील सैरभैर, त्यांच्या एकाधिकारशाहीला जनता आणि कार्यकर्तेही कंटाळले, खासदार धनंजय महाडिक यांचा टोला, कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची निर्विवाद सत्ता येण्याचा दावा
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी झाली छाननी प्रक्रिया, २१ उमेदवारी अर्ज ठरले अवैध, तर आतापर्यंत ४८ उमेदवारांनी घेतले अर्ज माघार
भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या बाबतीत सर्वाधिक मोठा असणाऱ्या प्रभाग क्रमांक २० मध्ये अजुनही पायाभूत सुविधांचा अभाव, ३२ हजारपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोचून नागरिकांच्या अपेक्षा पूर्तीचं आव्हान, प्रभाग क्रमांक २० चा पंचनामा...
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं झालं जल्लोषी स्वागत, रंकाळा तलावासह विविध बागा आणि हॉटेल गर्दीनं फुलली
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ७७० शाळांमध्ये तयार झाल्या पिंक रूम, किशोरवयीन मुलींचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी राबवलेला राज्यातील पहिला प्रकल्प
दाखल्याची नक्कल देण्यासाठी मागितली १ हजाराची लाच, कागल भूमी अभिलेख कार्यालयातील शिवराम कोरवी याला रंगेहाथ अटक
जनसुराज्य आणि आरपीआय आठवले गटाच्या रूपानं तयार झालेली चौथी आघाडी कोल्हापूर महापालिकेच्या ३० जागा लढवणार.इचलकरंजी महापालिका निवडणूक रिंगणातील ४५६ पैकी ११ उमेदवारांचे अर्ज अवैध, दिवसभरात २२ उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघार, अर्ज माघारीसाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग
चाला आरोग्यासाठी या उपक्रमातून रंकाळ्याची झाली परिक्रमा, मावळत्या वर्षाच्या अखेरीस आरोग्य संवर्धनासाठी झाला उपक्रम
इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी नेतेमंडळींकडुन नाराजांची मनधरणी, कोण कोणाचा काटा काढणार, याकडंही शहरवासीयांचं लक्ष
पन्हाळा तालुक्यातील आपटीपैकी सोमवारपेठ परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीती
कोल्हापूर महापालिका निवडणुका पारदर्शी आणि भयमुक्त होण्यासाठी सज्ज रहा, मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांचे निर्देश
चंदगड वनपरिक्षेत्रात आढळला तब्बल साडेनऊ फूट लांबीचा किंग कोब्रा, वनखात्यानं नागराजाला सोडलं सुरक्षित जंगलात
नवीन वर्षाचं स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी शहरात ३५ ठिकाणी नाकाबंदी, १३५ मद्यधुंद वाहन चालकांकडून ५० हजाराचा दंड वसूल
नववर्षाचा पहिलाच दिवस ठरला घातवार, कोल्हापुरातील अंडी उबवणी केंद्र आणि सादळे मादळे इथं झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू, एक गंभीर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा