आजच्या ठळक घडामोडी
जोरदार शक्ती प्रदर्शन करत आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून इच्छुकांनी महापालिका निवडणुकीसाठी सादर केले उमेदवारी अर्ज, कोल्हापुरातील सातही निवडणूक कार्यालयात प्रचंड गर्दी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दिवसभरात ६१३ अर्ज दाखल, तर इचलकरंजीत ६५ जागांसाठी तब्बल ४५६ उमेदवारी अर्ज दाखल, निवडणूक कार्यालयांना आलं जत्रेचं स्वरूप
चर्चा, बैठका, धाकधूक... कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी महायुतीच्या ८१ उमेदवारांची यादी जाहीर, उमेदवारी मिळालेले खुश, तर नाकारलेले नाराज
वर्षानुवर्षे त्याच त्या समस्या, उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय नागरिकांचं वास्तव्य असणाऱ्या निम्म्या प्रभागाला भेडसावते महापुराची भीती, प्रभाग क्रमांक ५ चा पंचनामा.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाकारलेल्या प्रबळ उमेदवारांना सोबत घेऊन जनसुराज्यशक्ती पक्षानं केली चौथी आघाडी
भरधाव कारनं मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात गडमुडशिंगी इथल्या तानाजी बापू दांगट यांचा मृत्यू
३१ डिसेंबरच्या निमित्तानं हॉटेल्स आणि बार सजले, मद्य विक्री दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत परवानगी, तर बार पहाटे पाच वाजेपर्यंत खुले राहणार
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू, मात्र कोल्हापुरातील अनेक राजकीय पक्षांच्या कार्यालयात शांतता, नेत्यांनी आपापल्या स्तरावरच हलवली निवडणुकीची सुत्रं
कोल्हापुरातील ड्रिमवर्ल्ड वॉटर पार्कजवळ रस्त्याखालून होणारी पाणी गळती दुरूस्त, मात्र रमणमळा चौकातील पाणी गळती कायम
सुरक्षेच्यादृष्टीनं जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून झाली अंबाबाई मंदिराची पाहणी, अतिक्रमण हटवण्याच्या महापालिका प्रशासनाला सक्त सूचना.डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाकडून जिल्हयात ९ पथकं आणि ७ तपासणी नाके सक्रिय, मद्य तस्करीवर विशेष लक्ष
मंदिर परिसरात रिव्हॉल्वर नेल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी बंडा साळुंखेंना केली अटक, पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ साळुंखे यांचं उपोषण
कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकही जागा लढवणार नाही, मात्र इंडिया आघाडीला देणार सक्रिय पाठिंबा
संगीतसूर्य कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि रंगकर्मी हेल्थ फाऊंडेशन आयोजित राजर्षि करंडक एकांकिका स्पर्धेला कोल्हापुरात प्रारंभ
कसबा वाळवे इथल्या हॉटेल यशमध्ये चोरी, सीसीटीव्हीत चोरटा कैद, राधानगरी तालुक्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी आमदार राजीव आवळे आणि पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांच्यात वाद, इचलकरंजीत काहीकाळ तणाव
गुटखा, तंबाखू, गांजा आणि दारुच्या व्यसनाविरोधात जनजागृती करण्यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्यावतीनं १ ते ७ जानेवारीमध्ये होणार विशेष अभियान
इचलकरंजी महापालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष महायुतीधून २ जागा लढणार, तर १० जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार
वाद मिटवण्यासाठी बोलावून तलवार हल्ला केल्याप्रकरणी पाचजणांना जुना राजवाडा पोलिसांनी केली अटक, दोन दिवसांची पोलिस कोठडी
वाहनं भाड्यानं घेवून परस्पर विकणाऱ्या संशयिताला मिळाली पोलिस कोठडी, पुणे आणि बीड मधून १९ लाख ६० हजाराची चार वाहनं शाहूपुरी पोलिसांनी केली हस्तगत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा