रत्नागिरी मध्ये दिवाळी 2026 जानेवारी मध्येच
🔴 ब्रेकिंग न्यूज | रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी | पाली मतदारसंघ
निवडणूक होण्याआधीच विरोधक नामशेष; लोकशाही धोक्यात असल्याचा गंभीर सवाल
पाली मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच विरोधक जवळपास मैदानाबाहेर फेकले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निवडून आल्यानंतर मिळणाऱ्या विकासनिधीपेक्षा निवडणुकीपूर्वीच दुप्पट आर्थिक फायदा काही उमेदवारांना झाल्याची उघड चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक स्पर्धेऐवजी व्यवहार बनत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकेकाळी प्रत्येक पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी असलेल्या पाली मतदारसंघात आज विरोधकच शिल्लक राहिले नसल्याचे वास्तव समोर येत आहे. विरोधक नसतील, तर सत्तेला जाब कोण विचारणार? आणि लोकशाही कशी टिकणार? — हा सवाल आता रत्नागिरी परिसरात जोर धरू लागला आहे.
या वेळच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा थेट आर्थिक फायद्याच्या अपेक्षा अधिक चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. “तीन, चार, पाच तारखेला भाव किती?” अशा चर्चांनी मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे सुसंस्कृत, सुशिक्षित आणि साधेपणासाठी ओळखला जाणारा रत्नागिरीचा मतदार विरोध करण्याची कोकणी मानसिकता गमावत चालला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
✊ नागरिकांना आवाहन
लोकशाही ही फक्त मतदानाची प्रक्रिया नाही, तर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.
विरोधक जिवंत ठेवणे, विचारांवर मतदान करणे आणि तात्पुरत्या फायद्याऐवजी दीर्घकालीन विकास निवडणे — हीच आजची गरज आहे.
पाली मतदारसंघातून सुरू झालेली ही परिस्थिती महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी इशाराच ठरत आहे.
मतदार जागे झाले, तर लोकशाही वाचेल; अन्यथा व्यवहार जिंकेल, अशी चिंता व्यक्त होत आहे.
— ब्रेकिंग न्यूज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा