Skip to main content
आजच्या ठळक घडामोडी
- एस. ट्रेडर्स आणि अन्य संलग्न कंपन्यांच्या घोटाळ्याबाबत आजवर झालेल्या चौकशीचा आढावा घेणार, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची माहिती
- कोल्हापुरातील बालकल्याण संकुलातील पूजाचा विवाह होणार, सोहळ्यासाठी जिल्हयातील मान्यवरांची असणार उपस्थिती
- भरधाव ट्रकनं मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्यानं २६ वर्षाच्या विवाहिता सोनाली कांबळे यांचा मृत्यू, बुधवारी रात्री टोपजवळची दुर्घटना
- उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा, हिंदुत्ववादी संघटनांची माहिती
- मुलाला वन विभागात नोकरी लावतो म्हणून महिलेची १८ लाखाची फसवणूक, पन्हाळा तालुक्यात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल
- कोल्हापूरच्या ओढ्यावरील यल्लमा देवीची आंबिल यात्रा होणार शनिवारी, भक्तांनी पारंपारिक नैवेद्य देण्याचं यात्रा कमिटीचं आवाहन
- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तहसील कार्यालयात घेतली आढावा बैठक, गावठाणापासून २०० मीटर परिघातील गट नंबर धारकांना अकृषक सनद देण्याची अंमलबजावणी सुरू
- कोल्हापुरातील रेसकोर्स नाका इथल्या ओम गणेश कॉलनीमधील ताराराणी उद्यानाची दुरावस्था संपवून महापालिकेमार्फत बागेची स्वच्छता आणि डागडुजी, सचिन मांगले यांचा पाठपुराव
- केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात झुंजार क्लबचा पीटीएम ब संघावर, तर खंडोबाचा दिलबहार संघावर ४-० गोल फरकानं विजय.
- एका चोरीचा तपास सुरू केला आणि ८ घरफोडी उघडकीस आल्या, इचलकरंजीतील शहापूर पोलिसांची कारवाई, दोघा चोरट्यांकडून तब्बल ५४ लाखांचे दागिने हस्तगत.
- डिजिटल अरेस्टची भीती दाखवत वृद्धाची तब्बल ५४ लाख ८६ हजाराची फसवणूक, दोघांच्या विरोधात इचलकरंजीत गुन्हा, वारंवार फसवणूक होऊनही नागरिक होत नाहीत सुज्ञ.
- उघडे चेंबर्स आणि अर्धवट स्थितीतील गटारींमुळं रोज होतायत अपघात, कोल्हापुरातील कळंबा कारागृहापासून निर्मिती कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याची स्थिती, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा.
- भुदरगड तालुक्यातील मौजे वाघापूर इथल्या स्वागत कमानीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी करत दलित समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, ठिय्या आंदोलन, पोलिसांसोबत बाचाबाची.
- पी एम किसान योजनेतील त्रुटी आणि अडचणी दूर करण्यासाठी खासदार महाडिक यांच्याकडून सूचना, संसदेत उपस्थित केले महत्वपूर्ण मुद्दे.
- कागलमधील निपाणी वेस परिसरात मधमाश्यांचा हल्ला, तिघेजण गंभीर जखमी, तर अन्य चौघांना किरकोळ इजा.
- विधिमंडळात गाजलेल्या जलसंधारण घोटाळ्यातील वॉटरफ्रंट कंपनीनं अधिकारी सुनील कुशिरे यांना मर्सिडीज बेंझ गाडी दिल्याचा तक्रारदार अरुण हत्ती यांचा आरोप.
- इचलकरंजीजवळ रुई इथं ऊसाच्या फडाला आग लागून ५ लाखाचं नुकसान, ऊस वाहतुकीच्या ५ बैलगाड्याही जळाल्या.
- सायबर चौक ते एस एस सी बोर्ड चौक मुख्य रस्त्यावरील १२ हातगाड्या आणि ६ डिजिटल बोर्ड महापालिकेनं हटवले, मुख्य रस्त्यावरील ३५ मिळकतींना नोटीसा.
- राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर झालेल्या अ युजलेस जिनिअस आणि बायको असून देखणी या नाटकांचं समिक्षण.
Comments
Post a Comment