रविंद्र लाहोटी यांनी सादर केली कविता..अटलबिहारी वाजपेयी
आज देशाचे माजी पंतप्रधान, श्रद्धेय भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त कोंजवडे, ता. पाटण येथे अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अटलजींची एक प्रेरणादायी कविता भाजपा सातारा जिल्हा सोशल मीडिया संयोजक रविंद्र लाहोटी यांनी सादर केली व त्या कवितेचा सखोल अर्थ उपस्थितांना समजावून सांगितला. अटलजी हे अत्यंत धाडसी व दूरदृष्टी असलेले पंतप्रधान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अणुऊर्जा चाचणी करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले तसेच कारगिल युद्धात भारताने विजय मिळवला. अटलजींनी घेतलेले अनेक ऐतिहासिक निर्णय आजही देशाच्या प्रगतीला दिशा देत आहेत.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ लाहोटी, डी. एन. जाधव, उत्तम जाधव सर, पाटण उत्तर मंडळाचे सरचिटणीस प्रवीण उदुगडे, अनिल माने, बाळासो मोरे, अजित पवार, सुभाष पवार, सुनील शेलार, नारायण पवार, संतोष बाळासो भोसले, विवेक निकम, चेतन उदुगडे, विलास सपकाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रवीण उदुगडे यांनीही अटलजींच्या जीवनप्रवासाविषयी सविस्तर माहिती सांगून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
🙏 अटलजींच्या विचारांना विनम्र अभिवादन!
#अटल_बिहारी_वाजपेयी #जन्मशताब्दी #अटलजी #भारत_रत्न #राष्ट्रसेवा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा