कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी
हाय व्होल्टेज ठरलेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत यड्रावकर-पाटील यांच्या राजर्षि शाहू विकास पॅनेलनं जिंकल्या नगराध्यक्ष पदासह २६ पैकी २० जागा, संजय पाटील-यड्रावकर ११ हजार १८७ मतांनी विजयी
चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस, नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनील काणेकर यांची बाजी, मात्र प्रमुख दोन्ही आघाडयांचे प्रत्येकी ८ उमेदवार निवडून आल्यानं, एका अपक्ष उमेदवाराला आला भाव
दि. २१ डिसेंबर २०२५
मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत, जनसुराज्य-भाजपा आणि दलित महासंघ आघाडीचा विजय, रश्मी शंतनू कोठावळे बनल्या मलकापूरच्या नगराध्यक्षा
आजऱ्यातील अटीतटीच्या लढतीत ताराराणी आघाडी आणि भाजपचे उमेदवार अशोक चराटी यांची नगराध्यक्षपदी बाजी, चराटी यांच्या आघाडीला मिळाल्या ८ जागा, तर विरोधी आघाड्यांना मिळाल्या ९ जागा, नगरपंचायतीमध्ये वर्चस्व कुणाचं याबद्दल उत्सुकत
मुरगूड नगरपरिषदेवर भाजप-शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व, १६ नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदावर महायुतीचा दणदणीत विजय, सुहासिनी प्रविणसिंह पाटील बनल्या मुरगूडच्या नगराध्यक्ष
कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंहराजे घाटगे यांच्या आघाडीची एक हाती सत्ता, नगराध्यक्ष पदासह सर्व २४ जागांवर विजय
गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा, नगराध्यक्षासह १७ जागांवर मिळवला विजय, तर भाजप-शिवसेना-जनसुराज्य आणि जनता दल युतीला मिळाल्या केवळ ५ जागा
हुपरी नगरपालिकेत फुललं कमळ, २१ पैकी १९ जागांवर भाजप-शिवसेना युतीला यश, हुपरी नगराध्यक्ष पदाचा बहुमान भाजपच्या मंगलराव माळगे यांना
केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टीस क्लबचा, झुंजारवर ४-२ नं विजय, तर खंडोबा आणि वेताळमाळ तालीम संघातील सामना सुटला १-१ बरोबर
- जिल्ह्यातील १३ नगराध्यक्ष पदांपैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी, तर ३ ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश
- जो जिता वही सिकंदर... जिल्हयातील १३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निकालाचं सविस्तर वृत्त
- अचानक झालेल्या युतीवर जनतेनं विश्वास दर्शवला, जिल्हयाच्या राजकारणात यापुढं ही युती भक्कम राहील, नामदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांची भूमिका
- प्रभाग क्रमांक ६ चा पंचनामा, वर्षानुवर्ष पायाभूत सुविधांची चर्चा, पूर प्रवण प्रभागात अनेक विकासकामांची गरज
- हातकणंगले नगरपरिषदेत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला १७ पैकी ६ जागा, तर काँग्रेसनं जिंकल्या ५ जागा, शिवसेना-भाजप आणि अपक्ष एकत्र येऊन महायुतीची सत्ता येण्याचे संकेत
- पन्हाळा नगरपरिषदेवर जनसुराज्यचा झेंडा, २० पैकी १६ जागांवर जनसुराज्य आणि स्थानिक आघाडीच्या उमेदवारांची बाजी, नगराध्यक्षपदी जयश्री पोवार विराजमान
- सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीच्या काळातही अमेरिकेत होणाऱ्या जनआंदोलनाचं चित्र लोकशाहीसाठी सकारात्मक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अजित अभ्यंकर यांचं प्रतिपादन
- अत्यंत अटीतटीच्या आणि स्थानिक गटांमध्ये प्रचंड इर्षा असलेल्या पेठवडगावच्या निवडणुकीत यादव पॅनेलला २० पैकी १५ जागांवर यश, तर विद्याताई गुलाबराव पोळ बनल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा
- कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह १२ जागांवर राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार विजयी, ८ जागांवर काँग्रेसला यश, मनिषा डांगे कुरूंदवाडच्या नूतन नगराध्यक्षा
- शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडी यादव पॅनेलला यश, नगराध्यक्ष पदासह जिंकल्या १५ जागा, आमदार अशोकराव माने यांचा मुलगा आणि सुनेचा दारुण पराभव.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा