अंधश्रद्धा आणि कर्मकांडा मध्ये अडकलेला वर्तमान जैन समाज
अंधश्रद्धा आणि कर्मकांडा मध्ये अडकलेला वर्तमान जैन समाज
एकविसाव्या शतकामध्ये पार्श्वनाथ आणि महावीरांनी सांगीतलेले तत्वज्ञान आपला समाज विसरत चाललोय. आपला समाज आज कर्मकांडामध्ये अडकलाय.
बहुसंख्या जैन समाज आज मुलगा व्हावा, लग्न व्हावे, नोकरी मिळावी म्हणून संकष्टी,दत्ताचा गुरुवार, मारुतीचा शनिवार, शंकराचा सोमवार करतोय, कुणी पैसा मिळावा म्हणून तिरुपतीला साकडे घालतोय. कोणी घरी सत्यनारायणाची पूजा घालतोय
ज्योतिषी लोकांचे ऐकून नरसोबाच्यावाडीला व त्रंबकेश्वरला जाऊन कालसर्प, नागबळी, पित्रूदोषाची पुजा घालतोय. आपलं बहुसंख्य समाज शिर्डी, शेगाव अक्कलकोट येथील महाराज यांचे प्रकटदिन साजरा करतोय.
तुह्माला जयंती साजरी करायचा असेलच तर आपले थोर आचार्य भद्रबाहु, आचार्य कुंदकुंद, आचार्य उमास्वामी यांचे साजरा करा. आणि या महान आचार्यांनी लिहेलेले ग्रंथ जसे कि कुंदकुंड आचार्यांनी लिहिलेले समयसार, नियमसार, पंचास्तिकायसार, प्रवचनासार, अष्टपहुड, उमास्वामी यांनी लिहलेले महान ग्रंथ तत्वार्थसूत्र वाचा. तुह्माला तुमच्या जीवनाचे सार कळायला मदत होईल. जगा आणि जगू द्या, अनेकांवाद हे तत्वज्ञान म्हणजे जैन धर्माने जगाला दिलेली एक मोठी देणगीच आहे.
आपला समाज शिर्डी, शेगाव, अक्कलकोट, तिरुपती, सिद्धिविनायकला जाऊन हजारो लाखो रुपये दान करतोय. तर तुह्माला विनंती आहे तुह्मी तो पैसा आपल्या धर्माच्या (दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी आणि जैन धर्मातील सगळे पंत) गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, समाजाच्या अनाथ मुलांसाठी, समाजाच्या वृध्दाश्रमा साठी खर्च करा. तोच पैसे आपल्या पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्वार साठी द्या.
शेवटी कुठे जायचे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझे एवढच म्हणणे आहे कि तुह्मी सारासार विचार करा, ते सांगतात त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करा, त्यांना प्रश्न विचारा , काय चांगले आहे ते घ्या, पण ते सांगतात ते खरे असेलच असे नाही. आणि ते सांगतात म्हणून कुठल्याही दुसऱ्या धर्म बद्दल द्वेष करू नका त्यांच्या सारखे धर्मांध बनू नको.
आपण जेव्हा मंदिर मध्ये जातो तेव्हा णमोकार मंत्र म्हणतो, तेव्हा आपण अरिहंतांना, सिद्धांना , आचार्यांना , उपाध्यायाना आणि सर्व साधूनां नमस्कार, नमन करतो. आपण आपल्या तीर्थकरांसमोर कोणतेही उपकार किंवा भौतिक लाभ मागत नाहीत. णमोकार मंत्र मध्ये देवतांच्या कोणत्याही विशिष्ट नावाचा किंवा विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख नाही हेच जैन धर्माचे वैशिष्ट आहे.
अंधश्रध्देपायी समाजाचा वेळ आणि पैसा नाहक वाया जात आहे. ज्योतिषी हे समाजाला देवाच्या नावाने घाबरून सोडतात. ते सांगतात कि तुमचा हातात काही नाही सगळे देवच करतो. देव पावावा म्हणून विविध प्रकारच्या पूजा घालायला लावतात.
विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन पुजा अर्चा करण्यात वेळ घालवताना आज आपला समाज दिसंत आहे.तोच वेळ आणि पैसा समाजातील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी खर्च केला तर त्यापेक्षा मोठे सत्कार्य असणार नाही.
जगा मध्ये फुकट काहीही मिळत नाही. जगा मध्ये कष्ट केल्या शिवाय काहीही मिळत नाही. तुमच्या आयुष्याचे रिमोट कंट्रोल तुमच्याच हात मध्ये आहे. तुह्मीच तुमचे भविष्य घडवू शकता.
पूर्वी आपल्या समाजा मध्ये कुंडली बघण्याची पद्दत नव्हती. कुंडली मुळे कित्येक मुलामुलींची लग्न लांबलेली आहेत. चांगली स्थळे हातातून जात आहेत. मुलामुलींची स्वभाव, रक्त गट, शिक्षण, घराणे बघण्या पेक्ष्या कुंडलीला जास्त महत्व देण्यात येत आहे. आणि कुंडली जमवून झालेले लग्न पण मोडत आहेत. कुंडली मुळे लग्न जुळवताना अडचण येत आहे. त्यामुळे कुंडली बघण्याचा अट्टाहास सोडा, मुलामुलींची मने जुळूद्या, दोनी घराण्याचे ऋणानुबंध जुळूद्या.
.
आपल्या लोकांना त्यांच्या महाआरती, महाप्रसादला बोलावले जाते. त्यांच्या आश्रम व मठा मध्ये बोलावले जाते . आपल्या धर्माचे अनेक लोक त्यांच्या आश्रमाच्या कार्या मध्ये गुंतलेले आहेत. त्यांना मोफत धर्माची पुस्तके, ग्रंथ दिली जातात. त्यांचे मासिके वाटले जातात, त्या मासिकां मध्ये दुसऱ्या जातीं बद्दल, धर्मा बद्दल द्वेष भरलेला असतो. त्यांच्या धर्माचे महात्मे सांगितले जाते. मग हळू हळू त्यांच्या संघटने मध्ये बोलावले जाते. तिथे सांगितले जाते कि जैन हि सनातन धर्माची शाखा आहे, महावीर हे विष्णूचे अवतार आहेत, जैन हि आमच्यातलीच एक जात आहे असे बिंबवले जाते. त्यांच्या मनात दुसऱ्या धर्म बद्दल द्वेष भरला जातो.
राम मंदिर उद्घाटन सोहळा दिवशी आपल्या समाजाच्या लोकांनी घरांवर झेंडे लावले, रांगोळी काढली, मोबाईल वर स्टेटस ठेवले गेले राम मंदिर झांकी है काशी मथुरा बाकी है.
ज्ञानवापी मशिदी मध्ये पूजा करायला परवानगी दिल्या मुळे त्यांच्या बरोबर आमच्या समाजाचे काही लोक पण खुश झाले. बहुसंख्य लोकाना मंदिर बांधले गेले त्या पेक्ष्या आम्ही त्या दुसऱ्या समाजाची कशी जिरवली याचा आनंद जास्त होता. म्हणजे बघा किती टोकाचा द्वेष त्या लोकांनी आपल्या लोकांच्या मध्ये भरला आहे. आता सगळ्या मशिदीचे सर्वेक्षण करायचे मागणी चालू झाली आहे, त्या मध्ये आमच्या समाजचे लोक पण पुढे आहेत. ते म्हणतात कि मुघलांनी त्यांची संस्कृती नष्ट केली त्यांची मंदिरे ताब्यात घेतली. तर आपल्या समाजाचे लोकांनी त्यांना विचारले पाहिजे कि तुह्मी आमची श्रमण संस्कृती संपवली त्याचे काय, तुम्ही आमची हजारो पुरातन मंदिरे ताब्यात घेतले जसे कि तिरुपती, केदारनाथ, कोणार्क, मीनाक्षी मंदिर, शृंगेरी, कोल्हापूरचे अंबाबाई, पंढरपूरचे विठोबा मंदिर, ती तुह्मी आमच्या ताब्यात देणार आहात का? तुह्मी ज्यांच्या बरोबर जय श्री रामाच्या घोषणा दिल्या त्यांना विचारा कि आमच्या गिरनार पर्वतावर जिथे त्यांच्या साधुनी जबरदस्तीने दत्ताचे पादुके ठेवले आहेत तिथे जाऊन आमच्या बरोबर जय नेमिनाथ घोषणा देणार का ? गिरनार बद्दल त्यांचे साधू आपल्या समाजाला धमक्या देत आहेत, केशरिया, पालीथाना, शिखरजी आणि असे बऱ्याच जैन क्षेत्रांवर याच लोकांनी अतिक्रमण करून ती ताब्यात घेण्याचे प्रयन्त चालू आहेत. शंकराचार्यांनी भक्ती चळवळ द्वारे ७/९ शतका मध्ये हजारो जैन मुनींना,श्रावकांना चरक्या मध्ये घालून जाळण्यात आले. याच शंकराचार्यांनी कुठे तरी लिहून ठेवले आहे कि, समजा जर तुमच्या मागे हत्ती लागला आणि तुह्माला जर पुढे जैन मंदिर दिसले तर हत्तीच्या पायाखाली तुमचा जीव गेला तरी चालेल पण जैन मंदिर मध्ये प्रवेश करू नका. नंतर च्या काळात कुमारीला भट्ट (८ वे शतक), रामानुजाचार्य (११ वे शतक), महादेवाचार्य (१३ वे शतक) यांनी आपला वैदिक धर्म आक्रमकपणे वाढवायला सुरवात केली.नंतरच्या राजे लोकांना धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले. राजाने धर्म बदलताच प्रजा देखील भितीपोटी आपला मूळ जैन धर्म सोडून वैदिक धर्मात प्रवेश करु लागली. हजारो जैन मंदिरे शैव व वैष्ण्व मंदिरामध्ये परिवर्तित करण्यात आली.
आज आपल्यातले काही लोक स्वतःला हिंदू म्हणून घेण्यात धन्य म्हणतात. तर आपल्याला त्यांना शहाणे केले पाहिजे, त्यांचे प्रभोधन केले पाहिजे. त्यांना सांगितले पाहिजे कि जैन हा स्वतंत्र धर्म आहे आणि ती कुठल्याही धर्माची शाखा नाही. जैन धर्म हा भारतातील सर्वात प्राचीन धर्म आहे. प्राचीन हिंदुस्थानात जंबुद्वीप - भरतक्षेत्राची स्थापना आदिनाथांचा मुलगा चक्रवर्ती भरत यांनी केली आणि त्यांच्या वरूनच आपल्या देशाला भारत या नावाने ओळखले जाऊ लागले. आपण ह्या देशाचे मूलनिवासी आहोत. एकेकाळी ह्या देशावर आपले राज्य होते. पहिले तीर्थकर आदिनाथां पासून महावीरांच्या पर्यंत आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य, त्यांचा मुलगा बिंबिसार, सम्राट अशोकांचा मुलगा कुणाल, त्यांचा मुलगा संप्रती, सम्राट खारवेल, चालुक्य, राष्ट्रकूट, कदंब,चोल, शिलाहार, राणी अब्बक्का हे सगळे राज घराणी जैन धर्मीय होते.
जैन समाजाला जागरूक केले पाहिजे, सरकारी जनगणने मध्ये, मुले जन्मतात त्या वेळी हॉस्पिटल मध्ये, शाळा व कॉलेज मध्ये धर्म जैन म्हणूनच नोंद करावी. त्या मुळे आपली लोकसंख्या नक्की किती आहे ती कळण्यास मदत होईल. कारण इतकी वर्ष आपण ऐकतोय कि सरकारी जनगणनेनुसार आपली लोकसंख्या ४५ लाखच आहे. तर ती साधारण १ कोटीच्या आसपास असायला हवी.
वैदिकांनि भारता मधून बुद्ध धर्म आणि त्यांची संस्कृती पण संपवुन टाकली. एकेकाळी बहुसंख्या असलेले जैन आणि बुद्ध हे दोनी अहिंसावादी धर्म आज अल्पसंख्य झाल्यामुळे आपल्या देशाचे अपरिणीत नुकसान झाले.
विज्ञानानुसार जगाची उत्पत्ती ही दहा अब्ज वर्षापूर्वी झाली. आपल्या माहितीनुसार विविध धर्माची उत्पत्ती ही आलिकडेच म्हणजे पाच ते दहा हजार हजार वर्षापूर्वीची आहे तर असा प्रश्ना उपस्थित होतो की त्याआधि कोणते धर्म् अस्तित्वात असतील ? लोकं कोणत्या देवाला पूजत असतील ?प्रत्येक धर्म सांगतो की या जगाचे निर्माण आमच्याच देवाने केले आहे. ह्याला वैज्ञानिक दृष्टीकोणातून पाहिल्यास कोणतेही तथ्या आढळंत नाही.
महावीर, बुद्ध आणि जगातल्या विविध महापुरुषांनी देवाचे असित्व नाकारले आहेत.
गुरुनानक, गुरुगोबिंद सिंग, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांनी सुद्धा अंधश्रद्धेला अविरतपणे विरोध केला.
महावीरांच्या काळी आपल्या देशा मध्ये आर्य टोळ्यांनी धुमाकूळ घातला होता. आर्य लोक हे बाहेरून आलेले होते. पशुमेध यज्ञ, नरमेध यज्ञ च्या नावावर मुक पशु आणि माणसांना पण बळी देण्यात येत होते. देवी-देवतांना खुश करण्यासाठी बळी देण्याची प्रथा रूढ होत होती. अंधश्रद्धा विकोपाला गेली होती, महावीरांनी त्याला विरोध केला.. वैदिकांच्या सृष्टी आणि विश्वाची काल्पनिक संकल्पने च्या विरुद्ध महावीरांनी सामर्थ्याने आणि अविरतपणे विरोध केला. त्यांनी पृथ्वीच्या आणि विश्वाच्या निर्मितेची संकल्पना नाकारली.
ईश्वर हा सुष्टीचा निर्माता आहे हि संकल्पना जैन धर्म मानत नाही.. वैदिक युगायुगात जगाची सृष्टी व प्रलय या गोष्टी मानतात तर जैन हि सृष्टी अनादि काळापासून असल्याचे मानतात. आणि जगातल्या शास्त्रज्ञ पण हेच सांगत आले आहेत.
वैदिक मता प्रमाणे ईश्वराची भक्ती केल्याने त्याच्या कृपेने मनुष्यास लाभ होतो, तर जैन मानतात कि आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माणा अनुसरुन जीव स्वतःच सुखी किंवा दुखी होतो.
आजचा जैन समाज अंधश्रद्धा आणि कर्मकांड मध्ये फासलेला आहे त्याला यातुन कसे बाहेर काढायचे याचा समाजाने विचार करणे गरजेचे आहे . आपल्या धर्मातील दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी आणि सर्व पंथाना एकत्र येऊन समाजाला या संकटातून बाहेर काढले पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा