स्वित्झर्लंडसारखे आरोग्य, जपानसारखे शिक्षण, आणि दुबईसारखे पर्यटन — हेच रत्नागिरीचे भविष्य असावे.

विषय : अभिनंदन, आनंद व अपेक्षा महोदय, जय शिवराय, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” असे म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आपण लोकशाहीच्या मार्गाने नेतृत्व स्वीकारले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. मी प्रविण रावसाहेब किणे — फ्रेश न्यूज, मॅंगो सिटी फाउंडेशन, प्रेस क्लब, जिल्हा माहिती अधिकार महासंघ, निर्भय सैनिक, सुसंवाद मीडिया व फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन करीत आहे. पुढील पाच वर्षांत आपल्या दूरदृष्टीतून रत्नागिरी ही केवळ जिल्हा न राहता पर्यटन, संस्कृती व सुशासनाचे मॉडेल शहर बनेल, याची आम्हाला खात्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात — “सत्ता ही सेवा करण्याची संधी असते.” आपले नेतृत्व हीच भावना जपत आहे, हे पाहून समाधान वाटते. आपण शिक्षक वृत्तीचे राजकारणी आहात. त्यामुळे प्रशासनात शिस्त, विचारशीलता व संवेदनशीलता येईल, अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. आज आपण केवळ निवडून आलेले प्रतिनिधी नाही, तर जनतेचे सेवक आहात. “जो जिता वही सिकंदर” या उक्तीप्रमाणे निवडणूक संपली असून आता पक्षीय चौकटीपलीकडे जाऊन रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जनता मालक आहे — आणि आपण तिचे विश्वासू सेवक आहात. कवी कुसुमाग्रज म्हणतात – “जगणं हे केवळ जगण्यासाठी नसतं, तर जग बदलण्यासाठी असतं.” ही ओळ आपल्या कार्यपद्धतीत उतरावी, हीच अपेक्षा. भविष्यात रत्नागिरीचा आमचा मुख्यमंत्री या भूमिकेत आपल्याला पाहण्याचे स्वप्न आम्ही पाहतो. ज्याप्रमाणे बारामती, नागपूर, नाशिक विकासाचे मानदंड ठरले, त्याचप्रमाणे रत्नागिरीही आदर्श ठरावी, ही ५११ सुजाण नागरिकांची सामूहिक भावना आहे. आमच्या काही अपेक्षा — • गायी रस्त्यावर न राहता गोशाळेत सुरक्षित असाव्यात. • लोकमान्य टिळक रुग्णालयात सांबरे हॉस्पिटल प्रमाणे मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी. • बेरोजगार तरुणांना रोजगार किंवा किमान ₹5000 मध्ये विना-डिपॉझिट गाळा उपलब्ध व्हावा. • रस्ते तक्रारीसाठी नव्हे, तर कार्यक्षमतेचे प्रतीक ठरावेत. • एकता मार्गावरील उर्वरित गार्डन पूर्ण करून “एक वड – एक जीवन” संकल्पना राबवावी. • मांडवी परिसरात स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करावी. • जनतेला कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत; यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट व सूचना फलक प्रभावीपणे राबवावेत. • शिक्षण व्यवस्था एस.व्ही.एम. व पोंदार शाळांप्रमाणे गुणवत्तापूर्ण व्हावी. • पर्यटन व फेरीवाला व्यवसायासाठी शिस्त, आदरातिथ्य व प्रशिक्षण आवश्यक आहे. मी स्वतः या नगरीसाठी अनेक स्वप्ने पाहिली आहेत — शिवसृष्टी, लेझर शो, पुतळे, खाऊ गल्ली, स्वयंसिद्धा यांसारख्या संकल्पना मी लेखी व डिझाईन सह पालकमंत्र्यांकडे मांडल्या असून त्या स्वीकारल्या गेल्या आहेत. स्वित्झर्लंडसारखे आरोग्य, जपानसारखे शिक्षण, आणि दुबईसारखे पर्यटन — हेच रत्नागिरीचे भविष्य असावे. आपल्या नेतृत्वाखाली हे स्वप्न साकार होईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपला प्रवास जनहिताचा, प्रेरणादायी आणि यशस्वी ठरो — ह्याच सदिच्छा. आपला विश्वासू, प्रविण किणे यशोदा, 205 बी-विंग, एकता मार्ग, रत्नागिरी मो. 7020843099 लेखक | दिग्दर्शक | विचारपरिवर्तन janatamalikindia@gmail.com www.mangocity.org

टिप्पण्या