आजच्या ठळक घडामोडी
इचलकरंजीत शिव-शाहू विकास आघाडी एकच चिन्ह आणि एकच झेंडा घेऊन जनतेसमोर जाणार
प्रसार माध्यमांचे मालक आणि पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीनं झाला निषेध
श्री संत गाडगे महाराजांची ६९ वी पुण्यतिथी परिट समाजाकडून साजरी, विविध उपक्रमांचं आयोजन
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ, पहिल्या टप्प्यात २७ माजी नगरसेवकांची उपस्थिती
महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होईल, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची इचलकरंजीत माहिती
ईशान्य भारतातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेण्याची गरज, अविनाश पानसरे व्याख्यानमालेत डॉ. नीता साने यांचं मत
पुण्यातील बांधकामविषयक प्रकल्पांची माहिती देणाऱ्या पुणे प्रॉपर्टी एक्स्पोला कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉलवर सुरवात
कोल्हापुरातील राजारामपुरी मेन रोडवर महेंद्र ज्वेलर्स समोर दुसऱ्या गल्लीत सलगर चहाची शाखा सुरू
केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम अ चा, दिलबहारवर ३-०, तर पाटाकडील ब चा संध्यामठवर २-० गोलनं एकतर्फी विजय.रविवारी २१ डिसेंबर रोजी होणार कोल्हापूर जिल्हयातील तेरासह राज्यातील एकूण २८८ नगरपरिषदा आणि नगरपालिकांची मतमोजणी, दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार
न्यूजद्वारे जिल्ह्यातील १३ नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण होणार रविवारी सकाळी साडेदहापासून
आईच्या उपचारासाठी दुचाकीवरून येणाऱ्या २९ वर्षीय डॉ. प्रसाद दिनकर बुगडे यांचा अपघाती मृत्यू, पंचगंगा नदी पुलाजवळ ट्रकनं मागून धडक दिल्यानं उमद्या तरूणाचा अंत
रमणमळा आणि ड्रिमवर्ल्ड वॉटर पार्क परिसरात तीन ठिकाणी पाणी गळती, दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असूनही महापालिकेला ना खेद-ना खंत
जुन्या कोल्हापुरातील दाटीवाटीच्या लोकवस्तीचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिस्तबध्द विकासकामांची आवश्यकता, समस्यांची यादी मोठी, लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यातील समन्वय महत्वाचा
भरधाव ट्रकनं कार, द्रोन बैलगाड्या आणि मोटरसायकलला दिली धडक, भीषण अपघातात दोघा बैलगाडी चालकांसह मोटरसायकल चालक आणि चार बैल जखमी, कागलमधील दुर्घटना
कुलगुरूंची अनुपस्थिती, बेकायदेशीर अधिसभा आणि मनमानी कारभाराविरोधात शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची निदर्शनं, तर अभाविपच्या निदर्शकांना पोलिसांकडून धक्काबुक्की
कोल्हापुरातील छत्रपती शाहू विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी बनवला टाकाऊ वस्तूंपासून ४ फुटी रोबोट
कोल्हापुरातील स्मशानभूमीसाठी शेणी दानाचा ओघ वाढला, विविध व्यक्ती आणि संस्थांची सामाजिक जाणीव.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा