आजच्या ठळक बातम्या
कागल-निढोरी राज्य मार्गावर भीषण अपघात, इचलकरंजीतील ३८ वर्षाच्या महिलेचा जागीच मृत्यू, तर पती किरकोळ जखमी
उदगावच्या दोन कुटुंबांची जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोरच मारामारी, महिलांचाही सहभाग, दोन्ही गटांवर गुन्हा दाखल, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
दि. २६ डिसेंबर २०२५
नाताळनिमित्त शासकीय सुट्टया असल्यानं श्री अंबाबाई दर्शनासाठी भाविक पर्यटकांची अलोट गर्दी, पितळी उंबऱ्यापासूनच घ्यावं लागलं देवी दर्शन, दोन दिवसांत ४ लाख भाविक देवीचरणी लीन
रहिवासी आणि व्यापारी भाग, कष्टकरी आणि उच्चभ्रू समाज, बागा स्टेडियम-खाऊ गल्ली आणि भाजी मंडई, एकाच प्रभागात समस्यांची आणि अपेक्षांची यादी मोठी, शहरातील अत्यंत मध्यवस्तीच्या प्रभाग क्रमांक १४ चा पंचनामा
सीपीआरमधील एमआरआय विभाग अग्निशमन यंत्रणेविनाच सुरु, दुर्घटना घडली तर जबाबदारी घेणार कोण
इचलकरंजीत महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेचं जागा वाटप निश्चित, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अलिप्त
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी एकत्र, जागा वाटप लवकरच जाहीर होणार
कोल्हापूर महानगरपालिकेची केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी ३ जानेवारी २०२६ रोजी होणार प्रसिध्द
बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून ट्रस्टवर प्रशासकाची नेमणूक करावी, हालसिध्दनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाची पत्रकार परिषदेत मागणी.
- बीएसएनएलची केबल खासगी हॅथवे कंपनीला जोडून ती वापरल्याचा प्रकार उघड, कागल तालुक्यातील मुरगुड इथल्या घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
- युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक ३ मधून महापालिका निवडणूक रिंगणात, राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा आग्रह आणि पाठबळामुळं आपण निवडणूक लढवतोय, कृष्णराज महाडिक यांची माहिती
- शहीद अभिजीत सुर्यवंशी आणि जीवनमुक्ती संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मशाल रॅली, आणि शेकडो दिपप्रज्वलित करत शहीदांना अभिवादन, व्हाईट आर्मीतर्फे मान्यवरांचा सन्मान
- इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी निष्ठावंताला उमेदवारी नाकारल्यानं नागरिक उतरले रस्त्यावर, भाजपमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर
- सोयीच्या बदल्यांसाठी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रांचा आधार घेतलेल्या १५ शिक्षकांच्या दाखल्यांचा अहवाल ४ महिने उलटले तरी गुलदस्त्यात, ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांचा आरोप
- बांगला देशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीच्यावतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं
- दारू वाहतूक करणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा लावून पकडलं, ११ लाखाचं साहित्य जप्त
- कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजवर १ हजार ५३७ उमेदवारी अर्जाची विक्री, ५ अर्ज दाखल, ४ ठिकाणी होणार मतमोजणी
- महापालिकेच्या निवडणुकीत प्रतिक्रिया दिलेल्या एका तरूणीच्या मुलाखतीच्या व्हिडीओवर अश्लिल टिप्पणी, संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिस उपअधीक्षकांकडं मागणी
- वाहन भाड्याला लावण्याचं अमिष दाखवून सुमारे २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आदित्य पाटीलला शाहुपुरी पोलिसांकडून अटक.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा