ठळक बातम्या

शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा पदवीदान समारंभ उत्साहात, प्रत्यक्ष आणि टपालाद्वारे एकूण ४९ हजार ९०२ पदव्यांचं वितरण, तर अक्षय नलवडे या विद्यार्थ्याचा राष्ट्रपती पदकानं सन्मान
महाविकास आघाडीच्या नेत्यांची झाली पत्रकार परिषद, ३३ जागांची मागणी करणाऱ्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाची काँग्रेसनं केली १२ जागांवर बोळवण, स्वीकृत नगरसेवक पदावर अद्याप निर्णय नाही

करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत झालेल्या २४ कोटी ६९ लाख ५३ हजार ८४९ रुपयांच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं केली तिघांना अटक

झोपडपट्टीपासून अलिशान बंगल्यापर्यंत आणि विविध धर्मियांच्या लोकवस्तीचा प्रभाग क्रमांक ४ मध्ये आहेत नागरिकांच्या अनेक अपेक्षा, मुलभूत सुविधांचा आणि कल्पक योजनांचाही अभाव, समस्यांच्या गर्तेतील प्रभाग क्रमांक ४ चा पंचनामा......

कोल्हापूर जिल्हयात रब्बी हंगामातील ८७.१८ टक्के पेरण्या पूर्ण, शिरोळ तालुक्यात सर्वाधिक १०० टक्के तर आजऱ्यात ६२.५० टक्के पेरण्या, जिल्हयात सर्वाधिक मक्याची लागवड
जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीनं इच्छुक उमेदवारांच्या झाल्या मुलाखती, महायुतीमधील घडामोडींवर बारीक लक्ष, आमदार विनय कोरे यांची माहिती
नाताळच्या पूर्वसंध्येला उत्साह शिगेला, शहरातील विविध चर्च आणि ख्रिश्चन बांधवांच्या घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई, ख्रिसमस ट्री सह सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सज्ज
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी ५३६ उमेदवारी अर्जाची विक्री, दोन दिवसातील विक्री अर्जाची संख्या हजारावर, अजुन एकही अर्ज दाखल नाही
महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाची झाली बैठक.
  • नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी क्षेत्रात स्टार्टअप्स सुरू करण्याबाबत झालं चर्चासत्र, सिबिक बिझनेस इन्क्युबेटर आणि सॅफ्रॉनएज टेक यांचं नियोजन
  • आम आदमी पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर, कोल्हापूर महानगरपालिकेसाठी सर्व ८१ जागा स्वतंत्रपणे लढवणार, संदीप देसाई यांची माहिती
  • इचलकरंजी महापालिका निवडणुकीमुळं ३ दिवसात तब्बल ९४ लाख रुपये वसुली, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी
  • थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
  • राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या तसंच सेवानिवृत्त झालेल्या बंदपत्रित आरोग्य सेविका नियमित होणार
  • खाजगी आराम बस अडवून ६० किलो चांदी लुटणाऱ्या संशयित सात आरोपींना पेठवडगाव न्यायालयानं सुनावली ३ दिवसांची पोलिस कोठडी, संशयित आरोपींच्या नातेवाईकांची न्यायालय परिसरात गर्दी
  • कोल्हापुरातील पंचगंगा तालीम परिसरातील घरात चोरी, ४ लाख रुपयांच्या देवाच्या मूर्ती चोरटयांनी पळवल्या
  • ऑनलाईन फसवणूक, डिजिटल अॅरेस्ट अशा प्रकारातून सायबर क्राईममध्ये वाढ, नागरिकांनी मोबाईलचा वापर काळजीपूर्वक करावा, रूपाली घाटगे यांचं आवाहन
  • उमेदवारी अर्जाची मागणी वाढली असली तरी राजकीय पक्षांकडून तिकीट निश्चित होत नसल्यानं इच्छुकांची वाढली घालमेल, इचलकरंजीत सर्वच पक्षांची सावध भूमिका
  • केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत रंकाळा तालमीचा टायब्रेकरमध्ये उत्तरेश्वर संघावर ५-३ गोलनं विजय, तर बुधवार पेठ आणि सम्राटनगर स्पोर्टस् संघातील सामना गोलशुन्य बरोबरीत.

टिप्पण्या