आजच्या ठळक घडामोडी

साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीच्या भरारी पथकातील अशासकीय सदस्यांना देण्यात येणार, वजनकाटे तपासणीचं प्रशिक्षण
शहापूरमधील चोरीप्रकरणी इचलकरंजी पोलिसांकडून २ अल्पवयीन मुलं ताब्यात, १ लाख १४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत
दि. २२ डिसेंबर २०२५
कोल्हापूरचा फौंड्री उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येऊन नियोजनबध्द आराखडा बनवावा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन, कोल्हापुरात फौंड्री परिषद संपन्न
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं पहिलं राज्य अधिवेशन कोल्हापुरात संपन्न, सामाजिक न्याय, समता, लोकशाही आणि मानवी हक्काचं रक्षण करण्यासाठी कार्यरत राहण्याचा केला निर्धार

द किरण माने शो, स्टोरी शिवराज्याभिषेकाची, या नाटकाचे प्रयोग होणार कोल्हापुरात, शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी घडलेल्या अनेक प्रसंगावर प्रकाश टाकणारा

तिकीट दरात वाढ होणार प्रति किलोमीटर फक्त १ पैशाची, पण तिजोरीत येणार वर्षाला ६०० कोटी रुपये, उत्पन्न वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेचं अफलातून नियोजन
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी दर्शनाची रशियन पर्यटकांना पडली भुरळ, देवीच्या चरणी गोंधळ गीतामध्ये सहभाग
खासदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण, महाविकास आघाडीनं २१ जागा देण्याची जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांची मागणी
समाज व्यवस्थेवर पकड निर्माण करण्याचा देशातील भांडवलदारांचा प्रयत्न, ज्येष्ठ विचारवंत बी. युवराज यांचं प्रतिपादन, कोल्हापुरात अवि पानसरे व्याख्यानमालेचा समारोप
केएसए चषक फुटबाल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाचा बालगोपालवर २-० तर फुलेवाडी क्रीडा मंडळाचा सुभाषनगर फुटबॉल क्लबवर १-० गोलनं विजय.नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं कागलमध्ये पुन्हा एकदा मंडलिक विरुध्द मुश्रीफ संघर्ष उफाळला, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, हिटलर आणि राजकारणात मस्ती नसावी, इथंपर्यंत कलगीतुरा
एक खिडकी केंद्रातून महापालिकेच्या इच्छुक उमेदवारांनी १५४ ना-हरकत दाखल्यांचं वितरण, विविध विभागांची सुमारे १८ लाख रुपयांची थकबाकी वसूल

भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ६३८ अंकांनी वाढून ८५ हजार ५६७ वर, तर निफ्टी २०६ अंकांनी वधारून २६ हजार १७२ वर, गुंतवणूकदारांनी कमावले ४.३ लाख कोटी रूपये

जुन्या आणि रांगड्या कोल्हापूरच्या समस्या आणि अपेक्षा कायम, मुलभूत सुविधा असल्या तरी रस्ते रुंदीकरण आणि दुरगामी विकासांच्या योजनांची गरज, प्रभाग क्रमांक १० चा पंचनामा...

शेतात खेळणाऱ्या ७ वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू, हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी इथली दुर्घटना
मंत्रालयात ओळख असल्याचं सांगत नोकरीच्या आमिषानं लाखोंची फसवणूक, समिर पाटील आणि सचिता म्हैसाणे या बंटी-बबलीला जुना राजवाडा पोलिसांकडून अटक
खाजगी रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर बिलिंग नियमांचं पालन करणं अनिवार्य, व्हेंटिलेटर का आणि किती काळ लावला, त्याचे दर काय, याबाबत प्रत्येक रुग्णालयाला नागरिकांना द्यावी लागणार लेखी माहित.           जेनेरिक औषधांची संकल्पना आणि १५०० कोटींची उलाढाल करणाऱ्या अर्जुन देशपांडे या तरूण उद्योजकाशी प्रेरणा

टिप्पण्या