पेरमिली पोलिसांची मोठी कारवाई; रापल्ले गावातील अवैध कोंबडा बाजारावर छापा
पेरमिली पोलिसांची मोठी कारवाई; रापल्ले गावातील अवैध कोंबडा बाजारावर छापा
By- दिपक चुनारकर
१६ आरोपींवर गुन्हा दाखल, ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
) : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या उप-पोलीस स्टेशन पेरमिलीच्या हद्दीतील रापल्ले गावात अवैध कोंबडा बाजार भरवून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या (Permili Police Raid) कारवाईत १६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ११ दुचाकींसह एकूण ३ लाख ८५ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रापल्ले गावाच्या बाहेर असलेल्या एका मोकळ्या सार्वजनिक जागेत मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांची झुंज लावून पैशाचा जुगार खेळला जात होता. या माहितीची खातरजमा करून (Permili Police Raid) पेरमिली पोलिसांनी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला. पोलीस दाखल होताच जुगार खेळणाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून १६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली.
मोठा मुद्देमाल जप्त:
या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
* ११ दुचाकी: ज्यामध्ये विना नंबरच्या गाड्यांसह एम.एच. ३३ पासिंगच्या विविध मोटारसायकलचा समावेश आहे (किंमत अंदाजे ३.७९ लाख रुपये).
* रोख रक्कम: आरोपींच्या अंगझडतीतून एकूण २,२४० रुपये रोख जप्त करण्यात आले.
* इतर साहित्य: झुंजीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोंबड्यांच्या पायाला बांधण्याच्या लोखंडी कात्या व इतर साहित्य.
असा एकूण ३,८१,३४० रुपयांचा (अंदाजे ३.८५ लाख) मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथक:
सदर कारवाई (Permili Police Raid) गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पाल सर, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश सर, अप्पर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पेरमिलीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोनूने, पोलीस शिपाई गणेश भर्रे, सरय्या गांधामवर, संदीप ठवकर, संजय तोकलवाड आणि दर्शन उंदीरवाडे यांचा समावेश होता. अवैध धंद्यांवर व जुगार खेळणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा