गावखडी - पूर्णगड पुलाला आज जवळपास तीस वर्षे होत आली, पूल जसाच्या तसा उभा आहे, लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर यांच्या शिफारसीमुळे निधीला मान्यता मिळाली होती
रत्नागिरी जिल्ह्यात ८०/९० च्या दशकात विकासात्मक दृष्टीकोनातून मागासलेला जिल्हा अशी ओळख होती. सार्वजनिक सोयी सुविधांची वानवा होती. त्या काळात लोकांना रस्ते, पूल नसल्या कारणाने पायी प्रवास करायला लागायचा. शहरात जायचे असेल तर पायी चालत मैलोनमैल प्रवास करावा लागत असायचा. मात्र त्या वेळच्या काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पायाभूत विकास झाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यात महत्त्वाचे नाव घ्यावे लागेल ते म्हणजे लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर यांचे.
राजापूर आणि रत्नागिरी हे दोन तालुका एकमेकांना जोडले जावेत म्हणून लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर गावोगावी भेटी दिल्या. तिथले सामाजिक प्रश्न समजून घेतले. लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर सार्वजनिक बांगकाम राज्यमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना गावोगावी पायी प्रवास करून विकासात्मक प्रश्न समजून घेतले. गावागावात जायला रस्ते नव्हते. पूल नव्हते. एस टी बस फेऱ्या नव्हत्या. काही गावात तर वीज देखील पोचलेली नव्हती. त्यावेळी लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर यांच्या मनात गावखडी ते पूर्णगड खाडी पात्रावर पूल उभारणी करण्यात यावी असे सूचित झाले. त्यावेळी राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता होती.
लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर बांधकाम राज्यमंत्री असताना गावखडी पूर्णगड खाडी पात्रावर पूल उभारणीसाठी निधी मंजूर करावा असा पत्रव्यवहार करून त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली. १९९५/९६ च्या दरम्याने गावखडी ते पूर्णगड या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे सहा कोटी रुपये निधी मंजूर केला. त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. १९९८ साली हा पूल पूर्णत्वास आला. सुमारे सहा कोटी रुपये त्यावेळी एवढा निधी खर्ची करण्यात आला. सुमारे ३५६ मीटर लांबीचा हा पूल आहे. आजही हा पूल अबाधित आणि सुस्थितीत आहे. आज जवळजवळ तीस वर्षे होत आली. हा पूल चांगला सुस्थितीत आहे.
आजचे राज्यकर्ते कोस्टल हायवेची बात करतात. समुद्री मार्गाच्या विकासाच्या वल्गना करतात. मात्र काँग्रेस पक्षाचे नेते लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर यांनी कोकणातील पर्यटन वाढावे, रत्नागिरी आणि सिंधुर्ग हे दोन जिल्हे समुद्र किनाऱ्यापासून रस्ते व पूलांच्या मार्गाने जोडले जावे, खाडीकिनारी वसलेल्या गावांचा विकास व्हावा, गावागावातील लोकांना शहरांमध्ये जाण्यासाठी किंवा औषधोपचाराकरिता दवाखान्यात जाण्यासाठी चांगले रस्ते पूल असावे असा विचार त्यावेळी लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर यांनी केला होता. आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अवस्था काय आहे हे लोकांना ज्ञात आहे. त्यावेळी लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर यांनी केलेले रस्ते आणि आज होत असलेले रस्ते यांचा गुणात्मक दर्जा काय आहे हे देखील जनता जाणून आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर यांनी जे तळमळीने काम केले, त्यावेळी निधीचा तुटवडा असताना देखील त्यांनी केलेली विकासाची कामे, धरणे आणि पूल आदि विकासाची कामे जनता विसरलेली नाही. 30 - 40 वर्षे झाली तरी हे पूल आणि रस्ते आजही तसेच तसे अबाधित आहेत आणि चांगल्या दर्जाचे टिकून आहेत. कोस्टल हायवेच्या विकासाची पायाभरणी खऱ्या अर्थाने लक्ष्मणराव तथा भाई साहेब हातणकर यांनीच केली आहे असे म्हणण्यास काहीच वावगे ठरणार नाही. काँग्रेस म्हणजेच विकास ही संज्ञा कोणीही विसरणार नाही.
Comments
Post a Comment