छायाचित्रकार गुरु चौगुले यांना "कोकण रत्न" पदवी प्रदान*

*छायाचित्रकार गुरु चौगुले  यांना "कोकण रत्न" पदवी प्रदान*
      कोकणातील प्रसिद्ध छायाचित्रकार,चौगुले फोटोज् चे सर्वेसर्वा गुरु चौगुले ,रत्नागिरी यांना यावर्षीची  प्रतिष्ठेची  *"कोकण रत्न"* पदवी  देऊन सन्मानित करण्यात आले.
       स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या “कोकणरत्न” या प्रतिष्ठित पदवीसाठी यंदा कोकणातील समाजसेवा, शिक्षण, साहित्य, कला, पत्रकारिता, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन व जनकल्याण या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांची निवड करण्यात आली आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
   गुरु चौगुले यांनी केलेले फोटोग्राफी आणि कोकणातील फोटोग्राफी क्षेत्र यामधील उल्लेखनीय कार्य. विविध संस्थांच्या माध्यमातून केलेली सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, स्थानिक बाजारपेठे ला जालना मिळावी यासाठी करत असलेले कार्य, पत्रकारित्या, कलाक्षेत्र,स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी करत असलेले कार्य अशा सर्वांगीण बाजूचा विचार करून संस्थेच्या वतीने *कोकणरत्न पदवी* देवून सन्मानित करण्यात आले.
     कोकण रत्न पदवी प्राप्त करणारे गुरु चौगुले हे कोकणातील पहिले छायाचित्रकार आहेत. या आधीही त्यांना राज्यस्तरीय *"कला गौरव"* पुरस्कार, राज्यस्तरीय *"आदर्श छायाचित्रकार"* पुरस्कार, तसेच *"बेस्ट फोटोग्राफी*" सोबत फोटोग्राफी क्षेत्रातील विविध पारितोषिक व पुरस्कार .मिळालेले आहेत
      हा भव्य व शानदार "कोकणरत्न पदवी" प्रदान सोहळा शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत, मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, व कोकणरत्न पदवीचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
       या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक श्री सचिन कळझुनकर सर यांची उपस्थिती लाभली.या वेळी मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कुवेसकर, खजिनदार श्री राजेंद्र सुर्वे, नेते श्री सुभाष राणे तसेच मुख्य सल्लागार श्री दिलीप लाड तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व‌ मान्यवर मंडळी उपस्थित होती.
     यावेळी गुरू चौगुले यांनी पुरस्काराचे संपूर्ण श्रेय गुरूबंधू राजू चौगुले, छायाचित्रण क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, छायाचित्रकार बंधू यांना दिले. तसेच सर्व हितचिंतकांचे  व. आयोजकांचे आभार देखील व्यक्त केले.

Comments