गोविंदगावात बंधारा, क्रीडांगण व स्वच्छता अभियानातून महाश्रमदान
गोविंदगावात बंधारा, क्रीडांगण व स्वच्छता अभियानातून महाश्रमदान
By-दिपक चुनारकर (गडचिरोली)
अहेरी तालुक्यातील गोविंदगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावात सामाजिक विकास, व्यक्तिगत विकास व समाजाची एकता दाखवून गावाचा विकास साधता येतो याचे प्रत्यक्ष गावकऱ्यांनी महा श्रमदान करून गावात क्रिकेटचे क्रीडांगण, स्वच्छता अभियान व जवळच्या नाल्यावर बंधारा बांधून विकास आपणही करू शकतो याचे सामाजिक उदाहरण समोर ठेवले.
महात्मा गांधींनी सांगितलेल्या स्वच्छता विषयावर गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जोर दिल्याने यातून परिसर स्वच्छता,पर्यावरण संरक्षण एकमेकांच्या सहभागाला वाव मिळतो. यातून पुढील पिढीला शारीरिक व मानसिक विकासाची प्रेरणा मिळते. गावातील नागरिकांना स्वयं प्रेरणेने मुलांना खेळांसाठी क्रीडांगण नसल्याने गावालगतच जागेची साफसफाई करून त्या ठिकाणी माती वगैरे टाकून क्रीडांगण तयार केले. तसेच गावात स्वच्छता अभियान राबवून रोगराई पासून दूर राहण्याचा संदेश इतर नागरिकांना दिला.
जवळच्या नाल्यावर बंधारा बांधण्यासाठी दगड गोळा करणे, माती रचने,पाणी अडथळा करणे सह विविध कामांचं मदत केली. यातून बंधाऱ्यामुळे भविष्यात गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढणार,शेतीसाठी स्थिर पाणी साठा उपलब्ध होऊन त्याला जलसंधारण मजबूत होणार असल्याची माहिती सरपंच शंकरी पोरतेट व ग्रामपंचायत अधिकारी नागसू नरोटे यांनी दिली.
महा श्रमदानाच्या सहभागात ग्रामपंचायत सदस्य किष्टया आलम,उपसरपंच तिरुपती अल्लुर, श्रीकांत बोरे,जनार्दन कोंडागुरले व इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते.खेळाचे मैदान तयार झाल्यानंतर त्याचे उद्घाटन सरपंच शंकरी पोरतेट यांचे हस्ते करून क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले.
Comments
Post a Comment