राजापुरातील दिवटे वाडी परिसरात रस्त्यांची खोदाई करून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू, रस्त्यांची पूर्ण वाट लागली, लोकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला
राजापूर शहरातील दिवटे वाडी बाणे पार परिसरात नळ पाणी योजनेसाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण गेल्या वर्षभरातच झालेले होते. आणि आता पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदाई न करता रस्त्यातच मधोमध खोदाई करण्यात आली. त्यामुळे स्थानिक लोकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांशी कोणत्याही प्रकारे संवाद न साधता नगर परिषद प्रशासनाने बोर्ड लावून तिथे खोदायला सुरुवात केली. त्यामुळे आता रस्त्यांची सुद्धा वाट लागली आहे. त्यामुळे खोदाई केलेल्या रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण कोण करणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय नगर परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता अजून सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता काळात ही कामे कशी काय सुरू होतात असा सवाल सुशांत मराठे यांनी उपस्थित केला. यावेळी श्री वादक, श्री गार्डी सर आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment