रत्नागिरीकर धावपटूचा ऑस्ट्रेलियात डंका
रोहन काळे : २२ तासांत १०४ किमी 'अल्ट्रा ट्रेल' पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ मुळचा रत्नागिरीचा व मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे वास्तव्यास असलेल्या रोहन काळे यांनी २२ तासांत माउंट कोझिओस्को या पर्वतावर १०४.८ किमी अल्ट्राट्रेल मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. यामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मारुती मंदिरानजीकच्या पटवर्धनवाडीमधील रहिवासी असलेले रोहन काळे काही वर्षांपासून मेलबर्नमध्ये वास्तव्यास
आहेत. अतिशय उत्तम धावपटू असलेल्या रोहन यांनी ऑस्ट्रेलियन मुख्य भूमीवरील सर्वांत उंच शिखर माउंट कोझिओस्को येथे झालेल्या १०४.८ किमी अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनमध्ये अप्रतिम कामगिरी केली.
या स्पर्धेत ४१०६ मीटर उंचीचा चढ, त्यातही प्रचंड वारा, मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी बर्फाचे पॅचेस असल्यामुळे ही शर्यत अत्यंत कठीण मानली जाते. ठरलेली मर्यादा २८ तासांची असताना रोहनने शुक्रवारी (ता. २८) सकाळी ८ वा. धाव सुरू करून २९ नोव्हेंबरला सकाळी ६ वा.
रोहन काळे
अभूतपूर्व अशी कामगिरी केली. रोहन काळे यांचे शिक्षण फाटक प्रशाला आणि फिनोलेक्स कॉलेज, रत्नागिरी येथे झाले. मूळचे रत्नागिरीतील काळे यांनी यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित थिबा पॅलेस, नाचणे, सोमेश्वर, कोळंबे ते भाट्ये या २१ किमीच्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या पहिल्या पर्वामध्ये सहभाग घेऊन
यश मिळवले होते तसेच मेलबर्न येथे त्यांनी आयर्नमॅन (लोहपुरुष) हा किताबसुद्धा मिळवला आहे. काळे यांच्या कामगिरीने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे तिसरे पर्व असून, रत्नागिरीकरांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि तंदुरुस्त राहावे, असे आवाहन फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment