उद्या पत्रकारांतर्फे (अहेरी )तालुका सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा@ 1,571 विद्यार्थी परीक्षा देणार

उद्या पत्रकारांतर्फे( अहेरी )तालुका सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा
1,571 विद्यार्थी परीक्षा देणार 

दिपक चुनारकर (गडचिरोली)

             तालुका पत्रकार संघटना अहेरी तर्फे पत्रकार दिनाच्या औचित्ताने संपूर्ण तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये निशुल्क सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार करण्यात आले आहे. तालुक्यात अहेरीतील तीन परीक्षा केंद्रासह अलापलीतील दोन, पेर्मिली,जीमलगट्टा, गुड्डीगुडम, कमलापूर, इंदाराम,वेलगुर, बोरी, महागाव, खमणचरू व इतर परीक्षा केंद्रावर माध्यमिक गटातील वर्ग नववी व दहावी करिता त्यांचा अभ्यासक्रम व सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा परीक्षेचे आयोजन उद्या 26डिसेम्बर रोजी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वात घेण्यात येत आहे.
    यात तालुक्यातील 1हजार 571 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून तालुक्यातून प्राविण्य प्राप्त तसेच केंद्रनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आलापल्ली येथे पत्रकार दिनी केला जाणार आहे.
             यापूर्वी अन्य उपक्रमासह तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा संघटनेतर्फे घेण्यात आली होती. त्यावेळीही उत्तम प्रतिसाद मिळाल्याने माध्यमिक गटांमध्येही उत्साह निर्माण होऊन त्या प्रकारच्या मागणीला तालुका पत्रकार संघटनेने पुढाकार घेऊन पूर्ण करण्याचा मानस केला असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

टिप्पण्या