सि.लूसी कुरियन (दीदी) यांचे 101 प्रेरणादायी विचार" सुनिल कांबळे लिखित पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन*
"*🔷सि.लूसी कुरियन (दीदी) यांचे 101 प्रेरणादायी विचार" सुनिल कांबळे लिखित पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन*
माहेर संस्थेच्या संस्थापिका, संचालिका, जगातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व, भारत सरकार नारी शक्ती पुरस्कार प्राप्त, अनाथ, निराधार यांची माय माऊली, आदरणीय सिस्टर लुसी कुरियन (दीदी) यांचे विचार सर्वांनाच प्रेरणादायी आहेत. माहेर संस्थेची स्थापना करून त्यांनी समाजातील अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित लोकांना सामाजिक प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. लूसी कुरियन यांना आत्तापर्यंत नॅशनल इंटरनॅशनल 350 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचे पुस्तक माहेर संस्था रत्नागिरीचे प्रकल्प प्रमुख सामाजिक, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी लिहिले आहे. त्यांच्या 101 प्रेरणादायी विचारांची पुस्तिका प्रकाशन नुकतेच पुण्यातील वडगाव शेरी, माहेर मुख्य शाखेच्या सभागृहात करण्यात आले. या प्रकाशनासाठी सिस्टर लूसी कुरियन, माहेर संस्थेचे पदाधिकारी हिरा बेगम मुल्ला अनिरुद्ध गडांकुश व देशभरातील माहेर संस्थेचे शाखाप्रमुख उपस्थित होते. या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी लेखक सुनील कांबळे यांनी आपल्या मनोगतात लुसी दीदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त व वार्षिक मूल्यांकन बैठकीवेळी हे पुस्तक प्रकाशन करण्याचं सौभाग्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले. आदरणीय दीदी यांनी प्रकाशनावेळी माझ्या विचाराने एखाद्या व्यक्तीला जरी प्रेरणा मिळाली व त्यांनी नवीन काम सुरू केले तर या पुस्तकाचे सार्थक झाले असे मी समजेन अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी माहेर संस्थेचे सात राज्यातील इन्चार्ज सामाजिक कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment